पोवाडा- लोकशाहीर विठ्ठल उमपांना शब्दापूर्ण श्रद्धांजली
शुक्रवार २६ तारखेला, नोव्हेंबर महिन्यात २०१० सालाला,
"जय भीम" मुखी, लोकशाहीर विठ्ठल उमप तारा निखळला II ध्रु II
अहमदनगर जिल्ह्यातला, मुळ चिकणी गावचा,
मुंबईत नायगाव, या कामगार वस्तीत पठ्ठा जन्माला,
कोळीगीत, भारुड, कव्वाली, गायक लोक कला वाला,
"विठ्ठल उमप पार्टी" घेऊन सातासमुद्रापार गेला,
"जाम्बुळ आख्यान " द्रोपदीच्या साक्षीने हो वदला, II १ II
शुक्रवार २६ तारखेला---------
जगी बाबासाहेबांचा विचारांचा, झेंडा फडकवला,
कलंदर थाप डफावर, बुलंद आवाज हो घुमला,
शब्द, सूर, तालाशी जन्मभर एकरूप राहिला,
रसिकांना करुनी लक्ष, फु- बाई - फु गरजला,
रंगमंचाची सेवा करत अवघा देह झिजवला II 2 II
शुक्रवार २६ तारखेला------
भास्कर, नंदेश, संदेश, उदेश रुपान उरला,
भारी पुरस्कार संगीत नाटक अकादमीचा मिळाला,
हात जोडूनी "सोमनाथ " करी, मुजरा या शाहिराला,
पवित्र दिक्षा भूमीवर, नागपूर नगरी लोकशाहीर कोसळला,
बहुरूपी, बहुढंगी, कलाकार चैत्य भूमीवर विसावला II 3 II
शुक्रवार २६ तारखेला-------
सोमनाथ आ. पगार
नाशिक
मो. ९२७३३५७१५९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा