पाऊस!!!!!!!!!!!
आनंदाने बेभान करणारा
हसवणारा अन रडवणारा
तळे, विहिरी भरवून, सागर तुम्बवणारा
नाव एक, स्वरूप अनेक
देहभान विसरून नाचायला लावणारा
प्रियकरासाठी प्रेयशीला भिजायला लावणारा.
पाऊस
साहेबाला ड्युटीवर जायचं टेन्शन देणारा
कपाटातला रेनकोट , छत्री भिजवणारा
बालगोपालांना गारा वेचायला लावणारा
डोंगर दर्र्यांवर हिरवळ फुलवणारा
उभ्या शेतातली पिके सड्वाणारा
कवेत येईल त्याला पूर बनून गिळणारा.
पाऊस
बरसला तर धुमाकूळ घालणारा
दुष्काळ पाडून व्याकूळ करणारा
तहानलेल्या पृथ्वीला घोट पाजणारा
विजेचे गगनाशी नाते जोडणारा
फुलपाखरांना फडफडायला लावणारा
पानवेली, झाडे लुशलुशीत करणारा.
पाऊस
रोजीरोटी देणारा अन हिरावाणारा
कर्जाचे डोक्यावर ओझे वाडवणारा
शेवटी आत्महतेला प्रवूत्त करणारा
माझ्या बापाच्या घोंगडीला भिजवणारा
भांडवलासाठी बैल विकायला लावणारा
कर्ज फेडून शेवटी वर्षभर उपाशी ठेवणारा
असा हा पाऊस
सोमनाथ पगार
क. का. वाघ तंत्रनिकेतन, सेकंड शिफ्ट, नाशिक -३.
मो. 919273357159
will like to've a book of your collection
उत्तर द्याहटवाkhupach chaan.. superb!!!
उत्तर द्याहटवा