आजवर लढली, नाही हरली
आज दिलं सारं, तरी मी जिंकली,
लाज लाजुनी, खूण मला पटली,
माझ्या इश्काची रेलगाडी सुटली ॥ धृ ॥
आई-बापानं राबुन जग दावलं,
फुलावानी बाई गं मला जपलं,
जवा लागली नवतीची चाहुल,
मन शहारलं अन बावरलं,
जवानीच्या ठेशनात मी चढली ॥ १ ॥
माझ्या इश्काची रेलगाडी सुटली
पाटीखाली कोंबडं जरी डाललं,
तसं माझंही अवचित घडलं,
तो भेटता आकाश ठेंगणं झालं,
त्यानं छेडता मन माझं भूललं,
माझ्या या दिलाची पतंग कटली ॥ २ ॥
माझ्या इश्काची रेलगाडी सुटली
जपू कशी जो तो पाहतो वाकून,
ऐवज नवतीचा माझा महान,
काम कठीण, कसा ठेवू जपून,
तन मनानं, झाली त्याला अर्पण,
तवा मला स्वर्गाची वाट भेटली ॥ ३ ॥
माझ्या इश्काची रेलगाडी सुटली
- सोमनाथ पगार,
के. के. वाघ पॉलिटेक्निक, (सेकंड शिफ्ट), नाशिक.
मो. ९२७३३५७१५९.