सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

देव कुलपात बंद

नाशिक शहरातील प्रदीर्घ वास्त्व्यानंतर काल प्रथमच नारोशंकराच्या मंदिरात दर्शनाचा योग आला
तेथील मंदिराची अवस्था पाहून मी अस्वस्थ झालो
त्याचाच परिपाक ही आजची कविता आहे. 
कुम्भमेल्यातही हे मंदिर दुर्लक्षित राहिले. 

देव कुलपात बंद

माझ्या भारत देशात
देव कुलपात बंद
तरीही भक्तिचा पुर
चरणी माथा हां छंद !!1!!
देवाच्या दानपेटिची
होते राजरोस चोरी
पायरीवर याचक
होई का सुखी भिकारी !!2!!
पै पैका जमा करून
मंदिरी सजे कळस
पाण्या विण येथे सुके
गरीबा घरी तुळस !!3!!
नाव ते जाणण्या साठी
मंदिरावर  ती पाटी
प्राथना सुरु ही मनी
वाजते मंदिरी घंटी !!4!!
पित्र श्राद्ध मेल्यावर
जीवंत पणी उपाशी
कावळे   तृप्त होउनी
लाभे कुणा पुण्य राशि !!5!!
माणसातल्या देवाची
पूजा माणूस पणाने
देवही जागा देवळी
होइल देव पणाने !!6!!
सोमनाथ आ. पगार
नाशिक मो 9273357159
ईमेल somnathpagar@gmail.com
ब्लॉग somnathpagar.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा