आज मंगळवार, दि. 31 में 2016 रोजी माझे सहकारी कर्मचारी मित्र कार्यशाळेतील निदेशक श्री. हरिभाऊ सांगळे सर (के.के.वाघ पॉलिटेक्निक, नाशिक) प्रदीर्घ 33 वर्ष्यानच्या सेवेनंतर तसेच कर्मचारी भविष्य निधी कार्यालय, नाशिक येथील Section Account Officer श्री. चकोर साहेब यांच्या सेवापुर्ती (retirement) निमित्त मी आजच रचलेली कविता ख़ास आपल्यासाठी सादर करतोय
कवितेचे नाव आहे -- सेवापुर्ती
नोकरी नी प्रमोशन,
आपणास असे सण,
इच्छा आकांक्षानी ईथे,
व्यापला प्रत्येक जण. ||1||
आकाशी झेप घेण्यास,
मनी रंगवूनी स्वप्न.
संघर्ष आयुष्य भर,
धुंधीत होऊन मग्न. ||2||
संस्कार रूपी शिदोरी,
असे जोडिला शिक्षण.
चालावी वादळ वाट,
बहरे मग जीवन. ||3||
पती- पत्नी, मूल-बाळ,
दोनाचे चार होऊन.
तारेवर कसरत,
तवं सफल जीवन. ||4||
ऐसे घेई लपेटुन,
होम, पर्सनल लोन.
सगे सोयरे सोबती,
सारे आयुष्याच् सोन. ||5||
आठ तास कामावर,
तिन्ही ऋतुत नेमान.
सेवापुर्ती सत्कारान,
सुरु इनिंग नवीन. ||6||
सोमनाथ आवडाजी पगार
गीतकार/ कवी,
नाशिक.
Mb. No.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
Blog-www. somnathpagar.blogspot.com
अप्रतिम सरजी
उत्तर द्याहटवासुंदर कविता
उत्तर द्याहटवा