सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

चांदवडची लावणी

मित्रहो!
हि रचना चांदवडच्या घराघरात पोहचली पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👇🏻
चांदवडची लावणी
चांदवडचा पेडा नि पाववडा
या सार्यांची चव मला चाखवा..
.चाखवा....चाखवा....
तुम्ही लई भारी, मला कारभारी
चला आजच चांदवड दाखवा.....दाखवा...
.दाखवा....!!ध्रु!!
तुम्ही लई भारी
गणेश पूर्ति बाप्पा नवसा पाव
भैरवनाथ, मारुती, खंडेराव
दर्शन घेउन इन्द्राईला जाव
राहुड घाटभी प्रेमान दाखवा.....दाखवा......दाखवा.....!!1!!
तुम्ही लई भारी
रेणुका मातेची महती न्यारी
चला जोडीन जाऊ चंद्रेश्वरी
टोल चुकवा, जाऊ भावड बारी हौसीन रंगमहालही दाखवा.... दाखवा....
दाखवा....!!2!!
तुम्ही लई भारी
जागृत दैवत आई केद्राई
कांदा, द्राक्ष्याची शेती भी भारी लई
देव आपल्याला हां प्रसन्न शनी
खोकड़ तलावात पाणी पाजवा...पाजवा...पाजवा..!!3!!
तुम्ही लई भारी
सोमवार पेठ्ला साडी भरजरी
सवड काडा थोड़ी नि काडा गाडी
नगर पंचायत, बाजार समिति
निवडणुक लडुन् हौस पुरवा....पुरवा...
पुरवा.....!!4!!
सोमनाथ आ. पगार, गीतकार/कवि
mb 9273357159
चांदवड, ह.मु. नाशिक
ब्लॉग www.somnathpagar.blogspot.com
ईमेल somnathapagar@gmail.com




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा