सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

आजींना भावपूर्ण श्रद्धांजली

आमची सर्वांची लाडकी वनसगावची आजी, कै.सौ. यमुणाबाई रामनाथ पा. शिंदे वनसगाव, ता.निफाड, जि. नाशिक यांना रविवार, दि. 19 नोव्हेंबर 2017 रोजी अचानक, आकस्मित देवाज्ञा झाली. आयुष्यात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हि ईश्वरास प्रार्थना. त्यांच्या पवित्र स्मृतीस हे भावपूर्ण शब्द सुमन अर्पण.
 भावपूर्ण श्रद्धांजली.

आई असे देवालय, साक्षात उदाहरण
मायेचे ते आम्हावर, उबदार पांघरून !!1!!

ममतेचा तो सागर, प्रेमाचं ते विरजण
आई आम्हा पिलांसाठी, झिजणारं हो चंदन !!2!!

घर झालं ते मंदिर, आई तुझ्या वास्तव्यानं
झालं जीवन सुंदर, आई तुझ्या अस्तित्वानं !!3!!

आता खरी झाली जाण, तुझ्या अशा ग! गेल्यानं
जीनं झालं सुनं, सुनं, कुठे लागे ना ग! मन !!4!!

नात्याची तू वीण घट्ट, स्पष्ट तुझं ग! बोलणं,
तू तर बंधा रुपया, मोल मोठं लाखाहून !!5!!

गेलं चटका लावून, तुझं अचानक जाण
पदरात आठवण, होरपळलं नि मन !!6!!

लाभो शांती तवं आत्म्या, ईश्वराशी हे मागणं
तू ग! यावं परतून, पुनर्जन्म तो घेऊन !!7!!

तवं चरणी वंदन, शब्द सुमनं अर्पण
भावपूर्ण श्रद्धांजली, विनम्र अभिवादन !!8!!


सोमनाथ पगार, नाशिक
गीतकार/कवी (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स एसोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा