शनिवार, १४ एप्रिल, २०१८

आम्हावर उपकार

भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.भीमराव रामजी आम्बेडकर यांच्या 127 व्या जयंती निमीत्त त्याना कोटि कोटि त्रिवार वंदन आणि माझ्या सर्व मित्रांना माझ्या कडून मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐

कविता: आम्हावर उपकार

भारत देशाचे रत्न
तुमचे कार्य हो थोर
लिहली राज्य घटना
आम्हावर उपकार ll1ll

वंचितांना दिला न्याय
करून दूर अन्याय
भाग्य आमचे म्हणुनी
समतेचा हा अध्याय ll2ll

स्वप्न नव्या भारताचे
प्रगत नी विकासाचे 
एक होऊनिया सारे
लक्ष वेधण्या जगाचे ll3ll

आपले आकाश एक 
सूर्यही आपला एक
जोडुया मनाचे नाते
कर्म करूया हो नेक ll4ll

कागदावर समता
हवाल दिल जनता
जाती धर्माच्या नावाने
धोक्यात आली बंधुता ll5ll

नकोत इथले धर्म
नकोत आम्हा या जाती
पुन्हा नव्याने जुळावी
माणुसकीचीच नाती ll7ll

कृपा करा आम्हावर
दूर करा जातीभेद
गाडून टाका हे धर्म
धर्मांधतेला दया छेद ll7ll

आज बाबासाहेबांच्या
जयंतीच्या निमित्ताने
करू एकच निर्धार
नांदू गुण्या गोविंदाने ll8ll

सोमनाथ पगार (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

1 टिप्पणी: