आपले सर्वांचे प्रेरणास्थान, कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री. बाळासाहेब वाघ अर्थात आपले लाडके भाऊ यांचा आज वाढदिवस.
आदरणीय भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐🎂
भाऊंना उदंड आरोग्यदायी सुख, समृद्ध आऊष्य लाभो, त्यांची प्रेरणा, मार्गदर्शन व शुभशिर्वाद सदैव्य आपल्या पाठीशी राहो, यासाठी आई भवानी चरणी प्रार्थना.
भाऊंच्या वाढदिवसानिमित्त माझी ही शब्द सुमने तिर्थस्वरूप भाऊंच्या चरणी सविनय सादर,🙏🏻,,,,,,,
गीत:- *कर्मधुरंधर आमचे भाऊ*
कर्मवीर पुत्र शिक्षण तज्ञ
ध्यानी मनी हो शिक्षणाचा यज्ञ
कर्मधुरंधर आमचे भाऊ
प्रेरणास्थान मुखी गुण गाऊ llध्रुll
कर्मधुरंधर आमचे भाऊ
सहकारातून समृद्धीकडे
विकासाची फुलवली हि मळे
साक्ष देई कर्मवीर बंधारे
विकासाचे दिसे रूप वेगळे
भाग्यविधाता पाईक हो होऊ ll१ll
कर्मधुरंधर आमचे भाऊ
समाज सेवेचा खरा आरसा
कर्मवीरांचा ते थोर वारसा
ज्ञानमंदिर उभारीले पहा
शिक्षणाचा हाती घेऊनी वसा
आधारवड हा आधार घेऊ ll२ll
कर्मधुरंधर आमचे भाऊ
साधी राहणी नि उच्च विचार
घावला नीती मूल्यांचा भांडार
ज्ञानवंत, गुणवंत उदार
पाठीवर हात आम्हा आधार
थोर कार्याचा वसा पुढे नेऊ ll३ll
कर्मधुरंधर आमचे भाऊ
*सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद
©® *सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक* ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा