गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८

सह्याद्री फार्म एक आनंद दायी अनुभव

 *सहयाद्री फार्म एक आनंददायी  अनुभव*
मोहाडी येथील सह्याद्री फार्मला गणेश उत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त जाण्याचा योग आला. यापूर्वी सहयाद्री फार्म व संचालक श्री. विलास शिंदे उर्फ आण्णा यांचे बाबत फक्त ऐकून होतो.
गेटच्या आत गाडी प्रवेश करतांना गेटवरील सिक्युरिटी गार्डने अतिशय आदराने आत जाण्यास इशारा केला. आत प्रवेश केल्यावर प्रत्यक्ष प्लांट पाहिला. सगळीकडे स्वच्छता, टापटीपपणा ठळकपणे जाणवला. सगळा परिसर मोठया उत्साहाने डोळ्यात साठविला. आज कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्लांट बघण्यासाठी व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी खास आमंत्रित केले होते. तेथील कर्मचारी वर्गाने अतिशय व्यवस्थित सर्व प्रक्रिया समजावून सांगितल्या. सर्व परिसर उत्साहाने  गजबजून गेला होता. छान पैकी पांढरा ड्रेस कोड, डोक्याला फेटा अशा थाटात कर्मचारी कर्मचारी आनंदात धावपळ करतांना दिसले.  प्रत्यक्ष प्लांट/ युनिट तसेच कार्यालय अतिशय कल्पकतेने आधुनिक यंत्रसामुग्रीयुक्त उभारले आहे. क्षणभर पाहणारा पाहतच राहतो. जाणीवपूर्वक लागवड केलेल्या शोभेच्या व इतर उपयुक्त झाडांनी परिसराची शोभा वाढवली आहे. काही दिवसात झाड मोठी झाल्यावर  परिसर अजूनही उठून दिसणार यात शंकाच नाही. सुंदर सुशोभीकरण डोळ्यात साठविले.
ग्रेप्स, फ्रुट, व्हेजिटेबल पॅकिंग हॉल, पलपिंग लाईन, फ्रोझन एफएफएफ पॅकिंग, मशिन एव्हपोरेटर, आय क्यु एफ फ्रिझिंग लाईन, रिफर लोडिंग डॉक्स, केच अप लाईन अँड ज्यूस ब्लेडिंग सेक्शन, जॅम असेपटीक कप फिलिंग लाईन असा हा संपूर्ण प्लांट पाहून झाला.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. संचालक विलास शिंदे आण्णा, सौ. शिंदे मॅडम, आदरणीय आई तथा इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मचाऱ्यांचे पाल्य, व कर्मचाऱ्यांचा विविध क्षेत्र व परीक्षांमध्ये यश संपादन केले म्हणून सत्कार करून सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. एवढंच नाही तर फार्मच्या कार्यालयात अकौंटला कार्यरत कर्मचारी एमकॉम झाला म्हणून सत्कार तसेच हायजीन विभागाचे  सफाई कर्मचारी परिसर स्वच्छ ठेवतात, अगदी मन लावून सेवा बजावतात म्हणून त्यांचाही सत्कार करण्यात आला. हे सर्व पाहून मन भारावून गेलं. हा सत्कार सुरु असतांना प्राचार्य वानखेडे सर उपस्थित कर्मचारी व त्यांच्या पाल्यांना आपल्या पालकांबाबत अमूल्य मार्गदर्शन करतांना सतत विदयार्थ्यांना उपदेश करू नये. नेहमी तुलना करू नये. पाल्याला एखाद्या वेळी अपयश मिळाले तरी टोकाचा निष्कर्ष काढून भावनांचा उद्रेक करू नये. विद्यार्थ्यांची गुणवत्ता ओळखून आश्वासक पालक बनणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केले. आपल्या मुलांना पालकांनी गुणवत्ता पूर्ण अनुभूती द्यावी. त्यासाठी सहलीला सहपरिवार जावं. वेगवेगळी स्थळ, प्रदर्शनांना भेटी द्याव्यात. त्यातून पाल्यांना जबाबदारीची जाणीव होईल. असे प्रतिपादन पुढे बोलतांना त्यांनी केले.
मुळातच *सहयाद्री - सभारंभाची शान* हे ब्रीद वाक्य घेऊन *गणेश उत्सव* दरवर्षी आयोजित केला जातो. यातुन कर्मचारी, अधिकारी व त्यांचे पाल्य यांना विविध कलागुण जोपासता येतात. व सादर करण्याची संधी मिळते. मुळात *सहयाद्री फार्म- सीडींग हॅपिनेस* हे  कंपनीच स्लोगन  कायमच मनात घर करून जातं.   स्लोगन नुसार सर्व कर्मचारी, अधिकारी, पाल्य व शेतकरी आनंदी राहावे, यासाठी हा प्रयत्न असल्याचा विलास शिंदे अण्णांनी या उत्सवा मागचा हेतू असल्याचा सांगितले. ऑफ द फार्मर्स, बाय द फार्मर्स, फॉर द फार्मर्स हि संकल्पना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली.
कर्मच्याऱ्यांचे पाल्य व कर्मचाऱ्यांनी नृत्य, गायन, नाट्य या विविध कला सादर केल्या. 
संचालक विलास शिंदे यांचेशी चर्चा करतांना त्यांची बुद्धिमत्ता, शिस्तप्रिय, अभ्यासू मात्र मनमिळाऊ स्वभाव भाव खाऊन गेला. सहपरिवार मोठया उत्सवात सर्वांच्या आनंदात सहभागी होऊनही मालक/ संचालक  असल्याचा कुठलाही अविर्भाव त्यांच्या वागण्यात जाणवला नाही. कदाचित या त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या स्वभावामुळेच सहयाद्री फार्मच्या प्रगतीची पताका देशविदेशात मोठया दिमाखात फडकत आहे. सह्याद्री फार्मस हि ऍग्रीकल्चर क्षेत्रातील लिडिंग इंडियन फार्मर्स प्रोड्युसर अशी अग्रेसर कंपनी असून गुणवत्ता पूर्ण फ्रेश फ्रुट्स, फ्रेश वेजिटेबल्स, प्रोसेस्ड फूड्स यासाठी कम्पणीचा सतत नाव लौकिक झळकत राहो यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

*सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

गीत:- लबाड पोरगं, स्टाईल करतं

लबाड पोरगं, स्टाईल करतं
पोरीला पाहून, स्माईल करतं llध्रुll
लबाड पोरगं.....

या केसांची हिप्पी, नाहीतर चप्पी
व्हाट्सअप, फेसबुकवर हॅपी
कधी हि स्पाईक, नवीन बाईक
ऑनलाइन न्यू, सरचिंग साईट
कमेंट देऊन, लाईक करतं ll१ll
लबाड पोरगं.....

 कॉलेजला दांडी, कॅंटीनला मांडी
मम्मी णि डॅड्डीला लावतय शेंडी
कडीमोडी जरी, दिसतेय बॉडी
सिग्नल हो तोडी, वर कुरघोडी
गॅंग बनवून, फाईट करतं ll२ll
लबाड पोरगं.......

समजतो हिरो, अभ्यासात झिरो
शायनिंग मारी, बनून हिरो
गर्ल फ्रेंड, बॉय फ्रेंड, हे नॉर्मल
रिलेशन शिप, झालीय फॉर्मल
चांगल्या डोळ्यांव, गॉगल लावतं ll३ll
लबाड पोरगं.......

 *सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏