मिसेस इंडिया इंटरनॅशनल 2017 च्या महाराष्ट्र फर्स्ट रनर अप तथा युवा अवेकनिंग फाउंडेशन, नाशिकच्या अध्यक्षा शिल्पी अवस्थी मॅडम यांचा वाढदिवस ओम त्र्यंबकराज अनाथ बालगृह, मु. तुपादेवी, पो. अंजनेरी, त्र्यंबकेश्वर , नाशिक येथे अनाथ बालकांना अन्न दान व त्यांना प्रेरणा देऊन साजरा करण्यात आला. बालगृहातील विद्यार्थांनी कविता, गाणी आदी कलागुण सादर केले. यावेळी विद्यार्थांना मार्गदर्शन करण्याची मला संधी मिळाली. याप्रसंगी नंदन खरे, देवेन कापडणीस, किशोर ठाकूर, अतुल सोनार, सविता खंदारे, बाळग्रहाचे संचालिका सौ अशादेवी अहिरराव, संचालक परमदेव अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगीचे काही क्षणचित्रे