गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

सहकार गीत:- सहकारातून समृद्धीकडे, झेप घेऊया गडे

https://youtube.com/user/SomnathPagar हि लिंक ओपन करून  youtube चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करण्यास नम्र विनंती💐🙏

सहकार गीत:- सहकारातून समृद्धीकडे, झेप घेऊया गडे

सहकारातून समृद्धीकडे, झेप घेऊया गडे
विकासाची चळवळ मोठी, चला जाऊया पुढे IIधृII

धनंजयराव गाडगीळ, विखे पाटलांची किमया
धुरिणांची दूरदृष्टी थोर, रचिला ज्यांनी पाया
गौरवशाली भारत भुचे, ज्ञानी हे प्रस्थ बडे II१II

एकविचार, एकजुटीने, आर्थिक उलाढाल
पाषाणालाही फोडील पान्हा, सहकाराचे बळ
नवचेतना जनामनात, यशोशिखर चढे II२II

विस्तारले साम्राज्य चौफेर, सहकार आधार
उद्योग, धंदे हे उभारून, खुले संधीचे द्वार
दिनदलित, कष्टकाऱ्यांना, वाट सुखाची पुढे ll३ll

बदलून गेले हो जीवन, झाले नवनिर्माण
दारिद्र्याचे निर्मूलन अन झाले जनकल्याण
समृद्धीचा सूर गवसला, दारी रांगोळी, सडे ll४ll

स्वावलंबी झाले शेतकरी, लाभे नवी ओळख
रोजगाराच्या अनेक संधी, मिटला हो काळोख
विकसित भारताचे स्वप्न, तृप्तीचे मुखी धडे ll५ll

सोमनाथ पगार, नाशिक, गितकार/कवी, (MSRA, MABMCM)
मो.9273357159. Blog:- https://somnathpagar.blogspot.com
E-mail: somnathapagar@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in
©®सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक
Follow me on my Blog, Whatsapp, Facebook, Twitter, Linkedin, Instagram.
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा