गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

अभंग:- मनात विठ्ठल

https://youtube.com/user/SomnathPagar हि लिंक ओपन करून youtube चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करण्यास नम्र विनंती💐🙏
अभंग:-मनात विठ्ठल

मनात विठ्ठल l ध्यानात विठ्ठल ll
दिसतो विठ्ठल l भोवताली llll

जीवनाची दिशा l जगण्याची आशा ll
भक्तीची हि नशा l विठ्ठल हो llll

विठ्ठलमय हे l झाले सारे श्वास ll
बंध झाले खास l विठ्ठलाशी llll

सुखाचे गुपित l साधले इप्सित ll
ध्येय हे निच्छित l विठ्ठल हो llll

सर्वांनी भजावा l आनंद मानावा ll
शरण हो जावा l विठ्ठलाशी llll

पंढरीची वारी l आनंद हा मनी ll
देव माझा गुणी l विठ्ठल हा llll

धन्य रुखमाई l विठ्ठलही धन्य
तन, धन मान्य l विठ्ठलाचे llll

घोर कलियुगी l झाला की हो सुखी ll
सोमनाथा मुखी l विठ्ठल हो llll

सोमनाथ पगार, नाशिक, गितकार/कवी, (MSRA, MABMCM)
मो.9273357159. Blog:- https://somnathpagar.blogspot.com
E-mail: somnathapagar@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in
©®सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक
Follow me on my Blog, Whatsapp, Facebook, Twitter, Linkedin, Instagram.
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा