सोमवार, ९ सप्टेंबर, २०१९

गीत: सप्तशृंगी मायेनं धावून आली

कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सिलेब्रेशन*

ती: राया, राया आई ही धावून आली
सप्तशृंगी मायेन धावून आली
आली सुख, समृद्धी आली खुशाली
आली खुशी आली गालावर लाली
तो: राणी, राणी आई ग! धावून आली
सप्तशृंगी मायेन धावून आली
आली सुख समृद्धी आली खुशाली
आली, आली खुशीची दिवाळी आली Ilध्रुII

ती: आहे आईची कीर्ती जगीया मोठी
आई धावून येई ही भक्तासाठी
घेऊ खण, नारळ भराया ओटी
वाहू साडी न चोळी, श्रध्येच्या पोटी
तो: चल चढून जाऊ वणीचा घाट
अग! जोडून पाहू आईचा थाट
माय, बाप, पोर सोर आनंदात
चल भक्ती भावाची पाहूया लाट
ती: ही नारायणी आई आधार झाली
तो: राणी, संसार झोळी सुखाची झालीll१ll

ती: धन, वैभवाची झाली बरसात
सदा मनात तेवे श्रध्येची ज्योत
पाहू भव्य दिव्य उत्सव चैत्रात
आली ही समृद्धीची पूणव रात
तो: झाला संसार सुखी आईचा वर
सारं आईनं दिलं पुरून उर
जाऊ नमन करू जोडून कर
अन ठवूया माथा चरणावर
ती: ही आई जगदंबा मायेचा थांबा
तो: झाली आई ही झाली जीवाला वाली II२II

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com 
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा