शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

मुक्तछंद रचना:- मी कामगार, निराधार

कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

मी कामगार
निराधार आहे
मजसाठी माझा पगार
हाच एकमेव
माझा आधार आहे.

खूपदा निघतो
क्रांती पेरण्यासाठी
पण घेतो माघार आहे
कारण मी घेतला
किराणा उधार आहे.

उंच इमारती, गाड्या
शाही मेजवानी
पाहून बेजार आहे
पवित्र हक्क बजावणारा
मी उद्दिग्न मतदार आहे.

महागाईचा झेलतो वार
भ्रष्ट्राचार आजार आहे
घातला स्वप्नांचा आचार
मनी टीचभर
पोटाचाच विचार आहे.

आधुनिक काळाचा
मी एल्गार आहे
पण घेतो माघार
माझ्या चिल्यापील्यांसाठी
मीच घरदार आहे.

इतिहासाची चाळतो पाने
वर्तमानी तलवार आहे
परिस्थितीचा गुलाम जरी
माझ्याच घामावर
त्यांचा सणवार आहे.

भांडवलाचे केले त्यांनी भांडवल
दावणीला कामगार आहे
मी समानतेचा देतो नारा
माझी डरकाळी थंड गार आहे
का तर डोई कर्जाचा भार आहे.

एकीचे बळ मिळते फळ
एकी कामगारांचे हत्यार आहे
आज उद्दिग्न, उद्याची ज्वाला
या विश्वाच्या समृद्धीचा
कामगारामुखी उच्चार आहे.

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक 📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा