रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

गीत:-अंबाबाई, तुळजाई, रेणुकाई, सप्तशृंगी

कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सिलेब्रेशन*

छत्रछाया शिरावरी, तेवे श्रद्धेची पणती
आदिमाया, आदिशक्ती, तुम्हा ठायी माझी भक्ती
अंबाबाई, तुळजाई, रेणुकाई, सप्तशृंगी
साडे तीन पिठामधी वास उदो! उदो! जगी Ilध्रुII

कोल्हापुरी अंबाबाई, तिन्ही लोकी डंका वाजे
मनोभावे रूप साजे, नाव तुझे जगी गाजे
उपासना करू तुझी, धार अमृताची पाजे
साडी, चोळी, आशा भोळी, प्रसादाला भाव ताजे
मोहमाया स्वाह होई, आनंदाला येई सुगी ll१ll

महिषासुर मर्दिनी, मुळपीठ तुळजाई
इडा, पीडा टळो सारे, कूल देवी तू ग! आई
 नवरात्री उत्सव हा, प्राणिमात्रा वरदायी
इहलोकी अनुभूती, वेल मांडवाला जाई
सदा धावा करू आई, जग मला उगा ठगी II२II

श्री क्षेत्र माहूर गडी, पतितांची तू ग! देवी
नाव शोभे रेणुकाई, सुख लाभे तुज पायी
करिता ग! तुझी वारी, पाप मिटे तुज ठायी
या विश्वाची तू जननी, खरा मार्ग तूच दावी
मनशांती, इच्छापूर्ती, उरी आस नाही उगी ll३ll

सप्तशृंगी, जगदंबा, ठाण वणी गडावरी
स्वयंभू, अठरा भुजा, भक्तांचा उद्धार करी
आयुध घेऊन करी, दृष्टांचा संहार करी
तूच दिसे चराचरी, अभिमान दाटे उरी
भाव, भक्तीची ही पताका, विडा मायेचा हा मुखी ll४ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏