रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

गीत:-साडे तीन पिठी, उदोकार, श्रद्धा, भक्ती

|| सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ||
|| शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ll
*आज पासुन सुरू होणाऱ्या*
*नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*
*आपणाला व आपल्या परिवारास आई जगदंबा सौख्य समृद्धी,आरोग्य व यश देवो. तसेच आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत. अशी आई जगदंबा चरणी प्रार्थना*
*!! जय माता दी !!*
🌹🌹🌹
💥✨💥✨💥✨
कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलेब्रेशन*

अंबा (बाई) कोल्हापुरी, भवानी तुळजापूरी
रेणुका माहुरी, सप्तशृंगी गडावरी
साडे तीन पिठी, उदोकार, श्रद्धा, भक्ती
विश्वाची जननी, आदिमाया, आदिशक्ती
उदो! उदो! ग! अंबाबाई, उदो! उदो! ग! तुळजाई,
उदो! उदो! ग! रेणुकाई, उदो! उदो! ग! सप्तशृंगी Ilध्रुII

पूर्ण शक्तीपीठ, महालक्ष्मी कोल्हापुरी
श्रध्येची ज्योत ही, आनंदा उधाण उरी
चतुर्भुज आई, संकटी झेलून धरी
चमत्कार दावी, झोळी यशानं तू भरी
अहंभाव जाई, तूच सुचवी ग! युक्ती ll१ll

तुळजा भवानी, कुलदैवताची किर्ती
तुळजा पुरी या, आद्यपीठ तीर्थक्षेत्री
भक्तास उद्धारी, अष्टभुजावाली मूर्ती
धावा हो करीता, तू दृष्टांत दावी नेत्री
शोभे भाळी गंध, कलियुगी अनुभूती II२II

माहूर गडावं, रेणुकाईची महती
साक्षात द्विभुजा, राही अवती, भवती
जागृत हे पीठ, सुखाला येई भरती
मस्तक चरणी, सांज, सकाळ आरती
साडी, चोळी, चुडा, होई पापातून मुक्ती ll३ll

वणी गडावरी, अर्धपीठ सप्तशृंगी
अठरा भुजात, आयुधं तुला शोभलं
महिषासुर नि शुंभ निशुंभा मारलं
साधना करीतो, तू ग! वक्ताला तारलं
सोमनाथ भक्ता, करी सन्मार्गाची सक्ती ll४ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏