गुरुवार, २ जानेवारी, २०२०

*नूतन वर्ष स्वागत गीत: नव वर्षाच्या स्वागता, जना मना होई हर्ष*


नमस्कार 💐🙏🏻💐माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!....
*नवीन वर्ष 2020* हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायी
आणि मंगलमय जावो हीच इश्वर चरणी प्रार्थना
💐💐🎉🎊💐👌✌🙏😇
कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

दिस आला, दिस गेला, एक सरले हो वर्ष
नव वर्षाच्या स्वागता, जना मना होई हर्ष Ilध्रुII

होवो सफल संकल्प, पायी पंढरीच्या वाऱ्या
सर्वां सुखाची पहाट, समृद्धीच्या व्हाव्या  फेऱ्या
वाटा प्रकाशाच्या दिसो, नव्या प्रवासा सहर्ष ll१ll

इडा, पीडा टळो सारी, मिटो दुःख नि लाचारी
उंच यशाची पताका, तंत्र ज्ञानाची भरारी
राग, द्वेष स्वःह व्हावे, साऱ्या जणांचा उत्कर्ष II२II

एकतेची वाहो गंगा, फुलावावी पानमळे
गुण्यागोविंदाने नांदो, धरेवरी या सगळे
जग आनंदी, स्वच्छंदी, लाभो हो परीस स्पर्श ll३ll

अहंकारा नसो थारा, विश्वशांतीच्या विचारा
नव्या युगाचा आरंभ, भावी पिढीच्या उद्धारा
व्हावे उज्ज्वल भविष्य, मनी हाच परामर्श ll४ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा