कृपया,
https://youtube.com/user/SomnathPagar
हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*
श्री. गणेशाला वंदून, शिद्धेश्वराला पुजून
दोन्ही हात जोडून, नटराजाला नमन
सायरा डान्स अकेडमी, गुणवत्ता नामी
कला तुमची, स्टेज आमचे, संधीची हमी
गौरवशाली परंपरा, विश्वासाचे नाव
हक्काचं व्यासपीठ, बारामती गौरव
कला, गुणांचा जागर, रौप्य महोत्सव
क्षण हा गौरवशाली, बारामती गौरव Ilध्रुII
स्वप्न मनी रंगले, आकाशी झेपावले
बळ पंखात कलांचे, व्यासपीठावरले
बारामतीच्या मातीचा, महिमा हो मोठा
अष्टपैलू कलाकार इथं, रत्नांचा साठा
शिक्षण, क्रीडा, शेती, उद्योग जोरात
उतुंग भरारी साहित्य, कलेच्या क्षेत्रात
मोरोपंतांचा अनमोल, साहित्यिक वारसा
भूमिका परकाया प्रवेश, सांस्कृतिक आरसा
या मातीतील कलांचा, करूया गौरव
सन्मान प्रेरणादायी, कार्याचा उत्सव ll१ll
भीमथडी नावानं मोठा ज्ञात इतिहास
नीरा डावा कालवा, कऱ्हा आम्हा खास
बारामतीच्या करामती, विश्वाला या ठाव
वैभवशाली संस्कारी, साहेबांचे गाव
पाणी फाउंडेशन, वेस्पा लौकिक मुलखात
द्राक्ष, साखर निर्यात, होई विदेशात
सिंचनाने प्रगती असे कर्मावर विश्वास
रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद हवा खास
नृत्य, गायन, अभिनय इथले वैभव
कला कारांचा गौरव, कलांचा गौरव II२II
*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा