गुरुवार, १२ मार्च, २०२०

*गीत:-बायको माझी करामती, गम्मत तुम्हा सांगू किती*

कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

बायको माझी करामती, गम्मत तुम्हा सांगू किती
सुंदर नारी, दिसं भारी दुर्गा बाई जिती जागती llध्रुll

भटार डोळी साधी भोळी, जहाल भारी हो गव्हाळी
व्हटाव कळी फटाकडी, टिकली शोभं लाल भाळी
वाघिणी गत डरकाळी निभाऊ तरी चाली रिती
ll१ll

हिरवा चुडा रान जाळी, धाक रांगडा  नरसाळी
मिठाचा खडा गोड गळा, लवंगी मिर्ची हडकुळी
खट्याळ थोडी लाडीगोडी, तिच्याच हाती माझी निती ll२ll

भार झाली हो पलंगाला, श्रीखंड पुरी जेवणाला
पाणी पुरी हवी नाश्त्याला, वाया जाई हा भाजीपाला
धुवावी लागं ताट, वाटी, सुतळी बॉम्ब वाट भिती ll३ll

राजा राणीच्या संसाराला, कळ्या, फुले आनंदाला
माहेरी जाई उत्साहाने, सासरी येई रुबाबाला
अशा देवीची मनोभावे, करतो नित्य मी आरती ll४ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com 
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा