कृपया,
https://youtube.com/user/SomnathPagar
हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*
पिशवीभर श्वास
पिशवीत कसे बसे कोंबून
मी परत लायनीत उभा आहे
ब्लॅकनं श्वास विकत घ्यायला
कारण
परत पुरेशा प्रमाणात
श्वास मिळतील का नाही
का होईल कृत्रिम तुटवडा
कि, परत ब्लॅकनं विकला जाईल
का जातील संपून श्वासन श्वास
याची काही खात्री नाही.
मलाही चिले, बिले आहेत
जबाबदारी आहेच ना माझ्यावर
त्यांच्या उदरभरणाची.
कोरोनामुळे जगभर लॉकडाऊन
काही तर क्वारंटाईन
उद्या असंच जग स्तब्ध राहीलं
तर ऐनवेळी धावपळ नको
म्हणून थोडे जास्तीचे श्वास
जपून लपवून ठेवणार आहे मी.
उद्या नाहीच मिळाले श्वास तर
होईल लुटालूट किंवा खून, दरोडे
दुकाना, दुकानात, चौकात, रस्त्यांवर
शासन तरी स्वस्तात कायकाय पुरविला हो?
बँकेत आहे पुरेशा चलनसाठा
काही सेविंग्ज अकाउंटला तर
काही मुदत ठेवी
पण ऐनवेळी चलनापेक्षा
श्वासच येतील कामाला
हो की नाही?
*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा