गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

*मुक्तछंद कविता:-नव्याने आखू काटकोन*

*वेगळा आशय विषय व वेगळी मांडणी*

*झालं काय, मी लॉकडाऊनमुळे घरीच असल्याने टेरेसवर गेलो, आजूबाजूला पाहतो तर धड काही सरळ दिसेना, प्लॉट तिरके, रस्ते,शेतांचे बांध तिरकस. सारं शहर अस्तव्यस्त, हे करणारा माणूस तर आहे. सर्वांना सरळ प्लॉट हवेत मात्र सरळ काहीच व कुणीच नाही, डोक्याला झिणझिण्या यायला लागल्या.*
*आणि मग माझ्या भावनांचा बांध फुटला तो या कवितेच्या स्वरूपात*

कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

अवघ्या धरणीचे
वाटे करायला निघालेला माणूस
एकही बांध सरळ ठेवला नाही
पडितावर हक्क त्याचाच
सामायिक असून सुद्धा

तुकडे पाडले
कंबर मोडले
एकेक भाग चंद्रकोर
अशुभ कोपरा निघालेल्या
प्लॉटवर बांधले घर

हे शहरातले प्लॉट कोणी पाडले
ओपन स्पेस कोणी सोडले
वाकडे तिकडे
रोड, रस्ते दिशाहीन
एकमेकांनाच भिडले

सरळ रेषा कागदावर
कागद फाडून बाहेर आल्या
जमिनीचे फाडताय पोट
सुड घेतायत
मातीवर मारून कोलांट उड्या

विकास नावाचा उपटशुंभ
अक्राळ विक्राळ
धरणीवर त्याचा डल्ला
कोरोनाला पाठवले
लढवायला किल्ला

कंपास पेन्सिल घेऊ हाती
नव्याने आखू काटकोन
समसमान करू मोजमाप
संसर्गाच्या ठेचू नांग्या
वारसाच्या सुखासाठी

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com 
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा