सस्नेह नमस्कार,
माझ्या वाढदिवसानिमित्ताने आज आपण सर्वांनी मला आपले शुभाशिर्वाद व शुभेच्छा देऊन उपकृत केले, त्यामुळे जगण्याला बळ व एक नवी दिशा मिळाली. भविष्यात वाटचाल करण्यास मला आपली सदिच्छा निश्चितच प्रेरणादायी ठरणार यात शंका नाही. सर्वांचे मनपूर्वक आभार 💐🙏🏻💐
शुभ उत्सव समयी
धुंद बेधुंद होऊनी
शुभेच्छांच्या वर्षावात
होई आनंद जिवनी II१II
तुम्हाविन मी न कोणी
जन्मो जन्मीचे हे नाते
बंध अतूट प्रेरक
जसे झाड अन पाते II२II
वाढ दिवसा निमित्त
पर्व नात्याचे हळवे
मित्र, आप्त नि सोयरे
जगण्यास बळ नवे II३II
शब्द आभार अपुरे
कर जुळे आपोआप
पुर्व संचिताचे पुण्य
अनमोल वारेमाप II४II
तुम्ही माझे मी तुमचा
नित्य सागरा भरती
शुभेच्छांची ही सुमने
राहु द्या होठावरती II५II
🙏🏻💐💐💐💐
माझा आजचा वाढदिवस
तुमच्यामुळे संस्मरणीय आहे
शुभेच्छांची हि सुमने
माझ्यासाठी अवर्णनीय आहे
तुम्ही सारे सोबत आहात
हीच माझी कमाई आहे
सर्वांचे मनपूर्वक आभार
आपलाच
🙏🏻💐💐💐🌷🌷
*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
1) https://youtube.com/c/SahityaTirth
2) https://youtube.com/user/SomnathPagar
3) https://youtube.com/c/NitaPagar
4) https://youtube.com/c/TejasPagar
*कृपया, विडिओ पाहून झाल्यावर, (Like, Share करून) सर्व चॅनल Subscribe करण्यास विनंती* 💐🙏🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा