विद्यार्थ्यांना विषय देऊन संवाद काव्य लिहण्याचा प्रश्न दिला जातो.
अशाच 'आम्ही मुले चित्र काढतो' या विषयानुसार कागदावं कल्पनांच्या (किंवा कॅनव्हास कल्पनांचा) या संवाद- अष्टाक्षरी काव्याची रचना केली आहे.
सदर काव्य रचना आपल्याला आवडल्यास, नावासह फॉरवड करावी, ही विनंती💐🙏🏻💐
टीप:- सदर काव्य रचनेतील नावे काल्पनिक आहेत...
अथर्व:
कल्पनांच्या कागदावं (कॅनव्हास कल्पनांचा)
रेखाटतो चित्र नवे
मुले आम्ही रंगवितो
स्वप्न उद्याचे जे हवे ||१||
मधुरा:
गुरुजनांची प्रेरणा
हाती ज्ञानाचा कुंचला
सरस्वतीच्या साक्षीनं
श्रीगणेशा हा रंगला ||२||
अथर्व:
अक्षरांच्या पर्वतावं
गाठू शिखरं यशाची
इंद्रधनूच्या कमानी
उजळणी पुनवेची ||३||
मधुरा:
अभ्यासाचे रंग भरू
निळे-जांभळे चित्रात
झेप घेऊ विश्वासाची
नव्या, अनोख्या क्षेत्रात ||४||
अथर्व, व मधुरा:
चित्र भासता वेगळे
नाचू लागे मनमोर
ज्ञान मंदिरी आगळे
चित्र रंगे घनघोर ||५|
सोमनाथ पगार, नाशिक
गीतकार/कवी, लेखक, युट्यूबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट. (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathpagar@yahoo.co.in
Follow/ Subscribe me on my Blog, Youtube Channel, Facebook, Whatsapp, Twitter, Linked in, Instagram, SoundCloud, Quora...
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
कृपया,
https://youtube.com/c/SahityaTirth
https://youtube.com/user/SomnathPagar
हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर Subscribe हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल Subscribed केल्यावर नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. तसेच https://somnathpagar.blogspot.com
हा Blog Follow करून Subscribe करण्यास विसरू नका. 💐🙏
तुमचे एक सब्सक्रिप्शन
हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन
Somnath Pagar Fan Club♻️
https://t.me/somnathpagarfanclub हा टेलिग्राम ग्रुप अवश्य जॉईन करा 💐
Feel free to contact for Promotion on YouTube Channel, Blog, etc.💐
©®
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा