मंगळवार, २९ मार्च, २०११

आरती- श्री गणपती बाप्पाची

मुषक वाहना, शिव पार्वती सुता,
सिद्धी विनायका, ओमकार स्वरुपा    
सुख शांती लाभू दे, लाडक्या भक्ता,
मंगलमुर्ती  मोरया, गजानना ,
जय देव, जय देव, जय बाप्पा गणपती 
तुज वंदिता होई इच्छा पुर्ती II धृ . II 

गळा सुवर्ण माळा, कुंडले कानी,
मानव रूप शरीर, गजमुखी, 
पिवळा पितांबर, दिसे शोभूनी,
सर्वांगी रक्त चंदनाची उटी,
हिरे रत्नानानी जडित, मुकुट मस्तकी
पसरली जगभर तुझीच कीर्ती II 1 II
जय देव, जय देव, जय बाप्पा गणपती 
      
विघ्नहरा, करूणा, दया सागरा,
लंबोदरा, चराचरी सामावला,
संपती, संतती, बुद्धी, मोक्ष दाता,
दिव्य दर्शन देतसे सोमनाथा ,
अग्र पूजेचा मान, गणेश बाप्पा,
तुला देवांमध्ये तेहतीस कोटी II २ II
जय देव, जय देव, जय बाप्पा गणपती  

सोमनाथ आ. पगार 
नाशिक
मो. ९२७३३५७१५९
 

पोवाडा- लोकशाहीर विठ्ठल उमपांना शब्दापूर्ण श्रद्धांजली

पोवाडा- लोकशाहीर विठ्ठल उमपांना शब्दापूर्ण श्रद्धांजली 

शुक्रवार २६ तारखेला, नोव्हेंबर महिन्यात २०१० सालाला,
"जय भीम" मुखी, लोकशाहीर विठ्ठल उमप तारा निखळला II ध्रु  II

अहमदनगर जिल्ह्यातला, मुळ चिकणी गावचा,
मुंबईत नायगाव, या कामगार वस्तीत पठ्ठा जन्माला,
कोळीगीत, भारुड, कव्वाली, गायक लोक कला वाला,
"विठ्ठल उमप पार्टी" घेऊन सातासमुद्रापार गेला,
 "जाम्बुळ आख्यान " द्रोपदीच्या साक्षीने हो वदला, II १ II
शुक्रवार २६ तारखेला---------

जगी बाबासाहेबांचा विचारांचा, झेंडा फडकवला,
कलंदर थाप डफावर, बुलंद आवाज हो घुमला,
शब्द, सूर, तालाशी जन्मभर एकरूप राहिला,
रसिकांना करुनी लक्ष, फु- बाई - फु  गरजला, 
रंगमंचाची सेवा करत अवघा देह झिजवला  II 2 II
शुक्रवार २६ तारखेला------

भास्कर, नंदेश, संदेश, उदेश रुपान उरला,
भारी पुरस्कार संगीत नाटक अकादमीचा मिळाला,
हात जोडूनी "सोमनाथ " करी, मुजरा या शाहिराला,
पवित्र दिक्षा भूमीवर, नागपूर नगरी लोकशाहीर कोसळला,
बहुरूपी, बहुढंगी, कलाकार चैत्य भूमीवर विसावला II 3 II
शुक्रवार २६ तारखेला-------

सोमनाथ आ. पगार 
नाशिक 
मो. ९२७३३५७१५९