तुझा स्पर्श
तुझा होता स्पर्श
मला होई हर्ष
विरहाचा क्षण
भासे मज वर्ष ||ध्रु||
तुझ्यासाठी सख्ये
जन्म पुन्हा घ्यावा
संसार सुखाचा
तुज सवे व्हावा
तुझ माझ प्रेम
जगास आदर्श ||1||
संसार वेलीला
पाने फुले यावी
तू मायची सुन
जगी किर्ती व्हावी
नयनी हे रूप
किती ग आकर्ष ||2||
तुझी माझी भेट
धरती आकाश
वळवाचा जसा
भिजवी पाऊस
तू माझ सर्वस्व
हाच परामर्श |3||
सोमनाथ आ. पगार
गीतकार/ कवी
नाशिक
Mb 9273357159
somnathapagar@gmail. com
www. somnathpagar. blogspot. com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा