google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: अष्टाक्षरी--तुझा स्पर्श

मंगळवार, ३१ मे, २०१६

अष्टाक्षरी--तुझा स्पर्श

तुझा स्पर्श

तुझा होता स्पर्श
मला होई हर्ष
विरहाचा क्षण
भासे मज वर्ष ||ध्रु||

तुझ्यासाठी सख्ये
जन्म पुन्हा घ्यावा
संसार सुखाचा
तुज सवे व्हावा 
तुझ माझ प्रेम
जगास आदर्श ||1||

संसार वेलीला
पाने फुले यावी
तू मायची सुन
जगी किर्ती व्हावी 
नयनी हे रूप
किती ग आकर्ष ||2||

तुझी माझी भेट
धरती आकाश
वळवाचा जसा
भिजवी पाऊस 
तू माझ सर्वस्व 
हाच परामर्श |3||

सोमनाथ आ. पगार
गीतकार/ कवी
नाशिक
Mb 9273357159
somnathapagar@gmail. com
www. somnathpagar. blogspot. com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: