google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 19 मार्च, 2020

गुरुवार, १९ मार्च, २०२०

*बाल गीत:-चला मुलांनो शिकूया आज जीवनाची शाळा*

कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

चला मुलांनो शिकूया
आज जीवनाची शाळा
वृक्ष, वेली ही पाखरे
पहा गुरे झाली गोळा llध्रुll

रिमझिम पाऊसाने
आली अवणीला लाली
नटूनी हिरवाईने
लाज दाटे तिच्या गाली
नव निर्मितीची जादू
पाही भास्कर भोळा ll१ll

वारा घाली शिळ कानी
पावा वाजविला कोणी
दूर कोकीळेची गाणी
मिठू बोले हा गाऊनी
झर, झर वाहे झरा
गिरी शिखरांचा मेळा ll२ll

धूम ठोकी कसा ससा
श्वास घेई मासा कसा
हाथी काढी उठ बशा
सिंहा शिकारीची नशा
ग्रह, ताऱ्यांचा या फेऱ्या
अचूक दावती वेळा ll३ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏