*चॅनेल सबस्क्राईब करण्यास आग्रहाची विनंती*💐🙏🏻
https://youtube.com/user/SomnathPagar
कृपया, लाईक, शेअर, कॉमेंट व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐🙏🏻
गावरान कोंबडी, दिसायला तांबडी
अंडे मी खुरड्यात, घालणार नाय
माग, माग फिरूनी, धरु नका तंगडी
तुमचं दानं कधी, मी टिपणार नाय IIधृII
गावरान कोंबडी.......
साऱ्या गावाचं पाणी, थेंब, थेंब पिऊनी
भागं माझी तहान, सारं अंग भिजूनी
नाव गल्ली बोळात, नश्या माझ्या डोळ्यात
तोऱ्यात फडफड, नाकावर टिुचूनी
नादी मला लावूनी, घालू नका लंगडी
नवं, जुनं तुमचं, हो फिटणार नाय II१ll
गावरान कोंबडी.....
भिडं चोचीला चोच, अन अंगाला अंग
लाल, लाल हा तुरा, फिरवी गरागरा
नका गोंडा घोळू, कसं तुम्हा टाळू
कॉक, कॉक करूनी, चालता तरातरा
गोल, गोल रंगाची, दावू नका बांगडी
पंखाच्या वाऱ्यानं मी, हो पटणार नाय II२II
गावरान कोंबडी......
*सोमनाथ पगार*, (सॅप) नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
१) अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२) स्क्रीन राइटर्स असोसियशन
३) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४) मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏