Its all about my Compositions/ Creation i.e. Poems, Songs, Stories etc.
शनिवार, ९ डिसेंबर, २०१७
सोमवार, ४ डिसेंबर, २०१७
गोरडे दादा भावपूर्ण श्रद्धांजली
नाशिक येथील कवी मित्र श्री. संजयजी गोराडे यांचे वडील दादा उर्फ कै. दगु शंकर गोराडे, बारागाव पिंप्री, ता. सिन्नर, जि. नाशिक यांचे प्रथम पुण्य स्मरण (मंगळवार, दि. 5 डिसेंम्बर 2017) अर्थात
वर्ष श्राद्धानिम्मित दादांना भावपूर्ण शब्द श्रद्धांजली
आठवांच्या पावसानं
भिजती नित्य नयन
पावलो, पावली येई
दादांचीच आठवण
जगाया देतसे बळ
तुमचीच शिकवण
चंदनागत झिजले
परोपकारी तनमन
आप्त नि संगे सोयरे
नाते रेशीम बंधन
दादा तुमचे संस्कार
पावन झाले जीवन
मुलं, सुना, नातवंड
आयुष्य नंदनवन
चिरकाल राहील हो
मनात हे देवपण
श्रद्धांजली नि चिंतन
प्रथम पुण्य स्मरण
अभिवादन आज हे
वर्ष श्राद्ध निमित्तानं
सोमनाथ पगार, नाशिक
गीतकार/कवी (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स एसोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏
आजींना भावपूर्ण श्रद्धांजली
आमची सर्वांची लाडकी वनसगावची आजी, कै.सौ. यमुणाबाई रामनाथ पा. शिंदे वनसगाव, ता.निफाड, जि. नाशिक यांना रविवार, दि. 19 नोव्हेंबर 2017 रोजी अचानक, आकस्मित देवाज्ञा झाली. आयुष्यात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हि ईश्वरास प्रार्थना. त्यांच्या पवित्र स्मृतीस हे भावपूर्ण शब्द सुमन अर्पण.
भावपूर्ण श्रद्धांजली.
आई असे देवालय, साक्षात उदाहरण
मायेचे ते आम्हावर, उबदार पांघरून !!1!!
ममतेचा तो सागर, प्रेमाचं ते विरजण
आई आम्हा पिलांसाठी, झिजणारं हो चंदन !!2!!
घर झालं ते मंदिर, आई तुझ्या वास्तव्यानं
झालं जीवन सुंदर, आई तुझ्या अस्तित्वानं !!3!!
आता खरी झाली जाण, तुझ्या अशा ग! गेल्यानं
जीनं झालं सुनं, सुनं, कुठे लागे ना ग! मन !!4!!
नात्याची तू वीण घट्ट, स्पष्ट तुझं ग! बोलणं,
तू तर बंधा रुपया, मोल मोठं लाखाहून !!5!!
गेलं चटका लावून, तुझं अचानक जाण
पदरात आठवण, होरपळलं नि मन !!6!!
लाभो शांती तवं आत्म्या, ईश्वराशी हे मागणं
तू ग! यावं परतून, पुनर्जन्म तो घेऊन !!7!!
तवं चरणी वंदन, शब्द सुमनं अर्पण
भावपूर्ण श्रद्धांजली, विनम्र अभिवादन !!8!!
सोमनाथ पगार, नाशिक
गीतकार/कवी (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स एसोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏
अभंन्ग: विठ्ठल
Lokmat ePaper - http://epaperlokmat.in/epapernew.php?articleid=LOK_NSLK_20171203_6_10
मित्रानो! महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक 'लोकमत'च्या नाशिक आवृत्तीतील वीकेंड या विशेष पानात रविवार दि. 3 डिसेंबर 2017 रोजी माझी 'विठ्ठल' ही अभंग या प्रकारातील रचना प्रसिद्ध झाली आहे. त्याबद्दल 'लोकमत'चे संपादक महोदय तसेच '२६/११चे अमर हुतात्मे' या शौर्यगाथेसह 'जोकर बनला किंगमेकर' या सुप्रसिद्ध बालकादंबरीचे लेखक व मुख्य उपसंपादक संजय वाघ सर यांचे मन:पूर्वक आभार.🙏🏻💐💐💐💐💐
अभंग: विठ्ठल
मनात विठ्ठल
ध्यानात विठ्ठल
दिसतो विठ्ठल
भोवताली !!1!!
जीवनाची दिशा
जगण्याची आशा
भक्तीची हि नशा
विठ्ठलच !!2!!
विठ्ठलमय हे
झाले सारे श्वास
बंध झाले खास
विठ्ठलाशी !!3!!
सुखाचे गुपित
साधले इप्सित
ध्येय हे निच्छित
विठ्ठल हो !!4!!
सर्वांनी भजावा
आनंद मानावा
शरण हो जावा
विठ्ठलाशी !!5!!
पंढरीची वारी
आनंद हा मनी
देव माझा गुणी
विठ्ठल हा !!6!!
धन्य रुखमाई
विठ्ठलही धन्य
तन, धन मान्य
विठ्ठलाचे !!7!!
घोर कलियुगी
झाला की हो सुखी
सोमनाथा मुखी
विठ्ठलच !!8!!
सोमनाथ पगार, नाशिक
गीतकार/कवी (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स एसोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)