google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 2016

मंगळवार, ३१ मे, २०१६

कविता--सेवापुर्ती (अष्टाक्षरी)

आज मंगळवार, दि. 31 में 2016 रोजी माझे सहकारी कर्मचारी मित्र कार्यशाळेतील निदेशक श्री. हरिभाऊ सांगळे सर (के.के.वाघ पॉलिटेक्निक, नाशिक) प्रदीर्घ 33 वर्ष्यानच्या सेवेनंतर  तसेच कर्मचारी भविष्य निधी कार्यालय, नाशिक येथील Section Account Officer श्री. चकोर साहेब यांच्या सेवापुर्ती (retirement) निमित्त मी आजच रचलेली कविता ख़ास आपल्यासाठी सादर करतोय

कवितेचे नाव आहे -- सेवापुर्ती

नोकरी नी प्रमोशन,
आपणास असे सण,
इच्छा आकांक्षानी ईथे,
व्यापला प्रत्येक जण. ||1||

आकाशी झेप घेण्यास,
मनी रंगवूनी स्वप्न.
संघर्ष आयुष्य भर,
धुंधीत होऊन मग्न. ||2||

संस्कार रूपी शिदोरी,
असे जोडिला शिक्षण.
चालावी वादळ वाट,
बहरे मग जीवन. ||3||

पती- पत्नी, मूल-बाळ,
दोनाचे  चार होऊन.
तारेवर कसरत,
तवं सफल जीवन. ||4||

ऐसे घेई लपेटुन,
होम, पर्सनल लोन.
सगे सोयरे सोबती,
सारे आयुष्याच् सोन. ||5||

आठ तास कामावर,
तिन्ही ऋतुत नेमान.
सेवापुर्ती सत्कारान,
सुरु इनिंग नवीन. ||6||

सोमनाथ आवडाजी पगार
गीतकार/ कवी, 
नाशिक.
Mb. No.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
Blog-www. somnathpagar.blogspot.com

तुझ्या नयनी हे दिसले काजळ

[2/20, 8:10 PM] Deshpande Madan गोरेगांव: कविमित्र सोमनाथ पगार तुमची कविता मला माझ्या लहानपणात घेऊन गेली...मायकेल काकांचे बोंगो अाणून मी त्यावर क्रिश्यचन लोकांची गाणी म्हणत असे...एक दिवस त्यांचा बोंगो माझ्या हातून फुटला अाणि मी रडत रडत त्यांच्याकडे गेलो....ते हसून म्हणाले " अरे त्यात काय?" हा घे अजून एक! नवीन अाहे.. अाज ते नाहीत....हे सूर त्यांना अर्पण ज्यांनी माझे लोकसंगीत जोपासले....

मदन देशपांडे
गोरेगाव
मुंबई
२०-२-२०१६
रात्रौ: ८:१०
[2/20, 8:10 PM] Deshpande Madan 
गोरेगांव: गित:- तुझ्या नयनी हे दिसले काजळ

तुझ्या नयनी हे दिसले काजळ
मनी भावनांचे ऊठले वादळ ||ध्रु||

नागमोड़ी तुझी ग! चाल
माझ्या दिलाचे लई ग! हाल
तुझे पाहुन बाई ग! चाळ
नयनी आले माझ्या सादळ||1||

गोरी गोरी तुझी कांती 
मना पाहुन मिळे शांती
बघ दोघांच् खेळल बाळ
मत माझ मांडल प्रांजळ ||2||

तुला हौशिन भरिन चूड़ा
हाकू जोडिन संसार गाड़ा
मनी प्रेमच वाजे ग!  टाळ
निवड तुझ्या आवडीच् पातळ ||3||

सोमनाथ आ. पगार
गीतकार/ कवी
नाशिक
Mb 9273357159
Email: somnathapagar@gmail.com
Blog: www.somnathpagar.blogspot.com
[2/20, 8:31 PM] somnathapagar: मदन सर
आपले आभार शब्दात व्यक्त करु शकत नाही

फक्त हात जोड़तो
🙏🏻
[2/20, 8:33 PM] Deshpande Madan गोरेगांव: अरे छोडो यार...... जब दिल मिले तो नो अाभार..... पण कविता लई बेस..........😄

अष्टाक्षरी--तुझा स्पर्श

तुझा स्पर्श

तुझा होता स्पर्श
मला होई हर्ष
विरहाचा क्षण
भासे मज वर्ष ||ध्रु||

तुझ्यासाठी सख्ये
जन्म पुन्हा घ्यावा
संसार सुखाचा
तुज सवे व्हावा 
तुझ माझ प्रेम
जगास आदर्श ||1||

संसार वेलीला
पाने फुले यावी
तू मायची सुन
जगी किर्ती व्हावी 
नयनी हे रूप
किती ग आकर्ष ||2||

तुझी माझी भेट
धरती आकाश
वळवाचा जसा
भिजवी पाऊस 
तू माझ सर्वस्व 
हाच परामर्श |3||

सोमनाथ आ. पगार
गीतकार/ कवी
नाशिक
Mb 9273357159
somnathapagar@gmail. com
www. somnathpagar. blogspot. com

बुधवार, २३ मार्च, २०१६

लावणी- फिरवला केसांवर कंगवा

लावणी-  फिरवला कंगवा केसांवर

पहा बाई साजन थांबला माझा
बाई ग! राया माझा दिलाचा राजा
फिरवला कंगवा केसांवर जरा
मजवर भिरभिरल्या या नजरा ॥ध्रु॥

नार मी अशी, बाई ग! फूल कळी
नजर लागे मला, लई मी भोळी
जगाची रित, केळली अशी प्रित
कस मला  नव्हत, माहीत काही
केसामधी जसा, लाजला गजरा ॥१॥

दोन्ही हातांचे, घालुनी गळा हार
गालावर लाली, नजर  कटयार
मानू मी कशी, या प्रेमामधी हार
नजरेचे वार, जिंकल ते सार
क्षणामधी बदलला, हा नखरा ॥२॥

तरुण वयात, आली मज लाज
साजश्रृंगार, मी ही सजले आज
मनात हुरहुर, कसली लाज
सावज हेरल, रूप माझ साज
आज खुला केला, दिलाचा पिंजरा ॥३॥

© सोमनाथ आ. पगार
गीतकार/कवि
नाशिक
Mb. No. ९२७३३५७१५९
Blog-www. somnathpagar.blogspot.com
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo. co. in