google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 8 ऑक्टो, 2018

सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

लावणी:- * तुमच्या उसाच्या गोडीनं शहारले*


बावरले अन थोडीसी सावरले
राया, तुम्ही मला जेव्हा असे हेरले
समजत होते तुम्हा कडू कारले
तुमच्या उसाच्या गोडीनं शहारले llध्रुll
तुमच्या उसाच्या गोडीनं.....


कसदार तुमची बागायती शेती
ऐकून होते तुमची लई मी ख्याती
नाव तुमचं माझ्या काळजावरती
ऊस हा वाढलाय जोमानं वरती
तण पाहून मनी मी घाबरले ll१ll
तुमच्या उसाच्या गोडीनं......

चला एक उसाचं गुऱ्हाळ हो काढू
काकवी दोन्ही हातांनी तुम्हाला वाढू
जोरदार वाढला या उसाला तोडू
भाऱ्यावर भारे कारखान्यात धाडू
उसाच्या शेतात स्वप्नात सावरले ll२ll
तुमच्या उसाच्या गोडीनं......

*सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक 📱💻📝🎸📻🎧🎼👆