google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 26 जून, 2012

मंगळवार, २६ जून, २०१२

किती दुरूनच न्याहळावं या ऐवजाला

किती दुरूनच न्याहळावं या ऐवजाला  



चाल मोहक, गौर वर्णी पाट पोट, 
डाळिंब फुटले, तुझे गाल, तुझे ओठ, 
किती दुरूनच न्याहळावं या ऐवजाला,  
घोर लागला ग! माझ्या या वयाला. // ध्रु //

छातीवर तुझ्या, किती टनाचा ग! भार,
यौवनाला यावा, जसा आंब्याचा मोहर,
तू नटून सजून, करी साज शृंगार,
का वाटे तू , माझ्यासाठी नखरा केला.  // 1 //
किती दुरूनच न्याहळावं........

तुझ्या डोळ्यात मी मुक्काम ठोकला,
माझ्या हृदयात, तुला आसरा दिला,
खाऊ दोघं भेळ, चल फिरायला,
तुझ्यासाठी नवा,  फ्लॅट बुक केला.           // 2 //
किती दुरूनच न्याहळावं........

का वाटे मला, तुला पाहावं, भेटावं,
वेगळी वाट, यावं तुझंच गाव,
टिप्पूर चांदणं, तुला कवेत घ्यावं,
खरं सांग असंच, वाटत का ग! तुला?     // 3 //
किती दुरूनच न्याहळावं........



सोमनाथ आ.पगार 
मो. 9273357159
Tech. Asst. Electrical Engg.
K.K.Wagh Polytechnic,Second Shift, 
Amrut Dham, Panchvati,  नाशिक  -3