google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 13 जुलै, 2022

बुधवार, १३ जुलै, २०२२

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

 *गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!*

जीवनाच्या शाळेत ज्ञान देऊन, मार्गदर्शन करून, वेळोवेळी पाठीवर शाबासकीची थाप देऊन जगण्याचे भान देऊन ज्यांनी मला घडवलं, लढायला शिकवलं, अशा तुमच्यासारख्या आदर्श, आदरणीय गुरूंचा मी ऋणी आहे. कळत नकळत तुमच्याकडून खूप काही शिकलो. आपले मनापासून धन्यवाद 💐🙏🏻💐

आपणास गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!💐🙏🏻💐


मज चार धाम गुरूचे चरण l

विद्या आणि ज्ञान गुरु ठायी ll१ll 


आदर, विश्वास मज पाठी खास l

दिव्यत्वचा भास गुरु माझा ll२ll 


गुरुपौर्णिमा ही शुद्ध पौर्णिमेला l

उधाण मनाला आषाढाशी ll३ll 


गुरूशी हे नाते जशी दिवा वात l

गुरु जीवनात मार्ग दावी ll४ll 


वेलीसाठी वृक्ष तृष्णा आणि पाणी l

कोकिळेस गाणी गुरु तैसा ll५ll 


एकच मागने लाभो हाची मेवा l

घडो गुरु सेवा सर्वकाळी ll६ll 


सोमनाथा दिशा गुरूने दावली l

चंदन सावली गुरु माझा ll७ll 


आपला आज्ञाधारक

*सोमनाथ पगार*, मो.९२७३३५७१५९

1) https://youtube.com/c/SahityaTirth

2) https://youtube.com/user/SomnathPagar

3) https://youtube.com/c/NitaPagar

4) https://youtube.com/c/TejasPagar

5) https://somnathpagar.blogspot.com

*कृपया, विडिओ पाहून झाल्यावर, (Like, Share करून) सर्व चॅनल Subscribe तसेच blog फॉल्लो करण्यास नम्र विनंती* 💐🙏🏻