google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 10/01/2018 - 11/01/2018

सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८

शिल्पी अवस्थी मॅडम यांचा वाढदिवस

मिसेस इंडिया इंटरनॅशनल 2017 च्या महाराष्ट्र फर्स्ट रनर अप तथा युवा अवेकनिंग फाउंडेशन, नाशिकच्या अध्यक्षा शिल्पी अवस्थी मॅडम यांचा वाढदिवस ओम त्र्यंबकराज अनाथ बालगृह, मु. तुपादेवी, पो. अंजनेरी, त्र्यंबकेश्वर , नाशिक येथे अनाथ बालकांना अन्न दान व त्यांना प्रेरणा देऊन साजरा करण्यात आला. बालगृहातील विद्यार्थांनी कविता, गाणी आदी कलागुण सादर केले. यावेळी विद्यार्थांना  मार्गदर्शन करण्याची मला संधी मिळाली.  याप्रसंगी नंदन खरे, देवेन कापडणीस, किशोर ठाकूर, अतुल सोनार, सविता खंदारे, बाळग्रहाचे संचालिका सौ अशादेवी अहिरराव, संचालक परमदेव अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगीचे काही क्षणचित्रे


शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

गीत:- कर्मधुरंधर आमचे भाऊ

आपले सर्वांचे प्रेरणास्थान, कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री. बाळासाहेब वाघ अर्थात आपले लाडके भाऊ यांचा आज वाढदिवस.
आदरणीय भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐🎂
भाऊंना उदंड आरोग्यदायी सुख, समृद्ध आऊष्य लाभो, त्यांची प्रेरणा, मार्गदर्शन व शुभशिर्वाद सदैव्य आपल्या पाठीशी राहो, यासाठी आई भवानी चरणी  प्रार्थना.
भाऊंच्या वाढदिवसानिमित्त माझी ही शब्द सुमने तिर्थस्वरूप भाऊंच्या  चरणी सविनय सादर,🙏🏻,,,,,,,

गीत:- *कर्मधुरंधर आमचे भाऊ*

कर्मवीर पुत्र शिक्षण तज्ञ
ध्यानी मनी हो शिक्षणाचा यज्ञ 
कर्मधुरंधर आमचे भाऊ
प्रेरणास्थान मुखी गुण गाऊ llध्रुll
कर्मधुरंधर आमचे भाऊ
 
सहकारातून समृद्धीकडे
विकासाची फुलवली हि मळे
साक्ष देई कर्मवीर बंधारे
विकासाचे दिसे रूप वेगळे
भाग्यविधाता पाईक हो होऊ ll१ll
कर्मधुरंधर आमचे भाऊ

समाज सेवेचा खरा आरसा
कर्मवीरांचा ते थोर वारसा
ज्ञानमंदिर उभारीले पहा
शिक्षणाचा हाती घेऊनी वसा
आधारवड हा आधार घेऊ ll२ll
कर्मधुरंधर आमचे भाऊ

साधी राहणी नि उच्च विचार
घावला नीती मूल्यांचा भांडार
ज्ञानवंत, गुणवंत उदार
पाठीवर हात आम्हा आधार
थोर कार्याचा वसा पुढे नेऊ ll३ll
कर्मधुरंधर आमचे भाऊ

 *सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® *सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक* ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

गजल:- रावणाला आता जाळायचे कशाला

*सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!*💐👏🏻

*सण दसरा आनंदाचा
शुभ कार्य नि मूहर्ताचा
सोने सुखाचे लुटण्याचा
सुख जनास वाटण्याचा* 

दसऱ्या निमित्त आपल्या सेवेत गजल पेश करतोय

गजल:- *रावणाला आता जाळायचे कशाला*
रावणाला आता जाळायचे कशाला
आरशाला सांगा भाळायचे कशाला ll१ll

देवळाला पैका माणूस हा भुकेला
राबणाऱ्या हाता पोळायचे कशाला ll२ll

धर्म जाती भेदाचा भार नकोसा
माणसाला सच्या चाळायचे कशाला ll३ll

प्रगतीचा झेंडा उंचावरी असेहा
तंत्रज्ञाना मोठ्या टाळायचे कशाला ll४ll

पोटपाणी फासा झाला जरी जगाया
दोरखंडा आता वाळायचे कशाला ll५ll

श्वास जाता मित्रा आवाज बंद होई 
वाळलेले पुष्पे माळायचे कशाला ll६ll

मान देऊ सर्वा कोणास राग नको
भारलेले नाते साळायचे कशाला ll७ll

सोमनाथा आता जागा तरी जगाला
पेटवूनी माथा जाळायचे कशाला ll८ll

 *सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® *सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक* ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८

सह्याद्री फार्म एक आनंद दायी अनुभव

 *सहयाद्री फार्म एक आनंददायी  अनुभव*
मोहाडी येथील सह्याद्री फार्मला गणेश उत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त जाण्याचा योग आला. यापूर्वी सहयाद्री फार्म व संचालक श्री. विलास शिंदे उर्फ आण्णा यांचे बाबत फक्त ऐकून होतो.
गेटच्या आत गाडी प्रवेश करतांना गेटवरील सिक्युरिटी गार्डने अतिशय आदराने आत जाण्यास इशारा केला. आत प्रवेश केल्यावर प्रत्यक्ष प्लांट पाहिला. सगळीकडे स्वच्छता, टापटीपपणा ठळकपणे जाणवला. सगळा परिसर मोठया उत्साहाने डोळ्यात साठविला. आज कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्लांट बघण्यासाठी व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी खास आमंत्रित केले होते. तेथील कर्मचारी वर्गाने अतिशय व्यवस्थित सर्व प्रक्रिया समजावून सांगितल्या. सर्व परिसर उत्साहाने  गजबजून गेला होता. छान पैकी पांढरा ड्रेस कोड, डोक्याला फेटा अशा थाटात कर्मचारी कर्मचारी आनंदात धावपळ करतांना दिसले.  प्रत्यक्ष प्लांट/ युनिट तसेच कार्यालय अतिशय कल्पकतेने आधुनिक यंत्रसामुग्रीयुक्त उभारले आहे. क्षणभर पाहणारा पाहतच राहतो. जाणीवपूर्वक लागवड केलेल्या शोभेच्या व इतर उपयुक्त झाडांनी परिसराची शोभा वाढवली आहे. काही दिवसात झाड मोठी झाल्यावर  परिसर अजूनही उठून दिसणार यात शंकाच नाही. सुंदर सुशोभीकरण डोळ्यात साठविले.
ग्रेप्स, फ्रुट, व्हेजिटेबल पॅकिंग हॉल, पलपिंग लाईन, फ्रोझन एफएफएफ पॅकिंग, मशिन एव्हपोरेटर, आय क्यु एफ फ्रिझिंग लाईन, रिफर लोडिंग डॉक्स, केच अप लाईन अँड ज्यूस ब्लेडिंग सेक्शन, जॅम असेपटीक कप फिलिंग लाईन असा हा संपूर्ण प्लांट पाहून झाला.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. संचालक विलास शिंदे आण्णा, सौ. शिंदे मॅडम, आदरणीय आई तथा इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मचाऱ्यांचे पाल्य, व कर्मचाऱ्यांचा विविध क्षेत्र व परीक्षांमध्ये यश संपादन केले म्हणून सत्कार करून सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. एवढंच नाही तर फार्मच्या कार्यालयात अकौंटला कार्यरत कर्मचारी एमकॉम झाला म्हणून सत्कार तसेच हायजीन विभागाचे  सफाई कर्मचारी परिसर स्वच्छ ठेवतात, अगदी मन लावून सेवा बजावतात म्हणून त्यांचाही सत्कार करण्यात आला. हे सर्व पाहून मन भारावून गेलं. हा सत्कार सुरु असतांना प्राचार्य वानखेडे सर उपस्थित कर्मचारी व त्यांच्या पाल्यांना आपल्या पालकांबाबत अमूल्य मार्गदर्शन करतांना सतत विदयार्थ्यांना उपदेश करू नये. नेहमी तुलना करू नये. पाल्याला एखाद्या वेळी अपयश मिळाले तरी टोकाचा निष्कर्ष काढून भावनांचा उद्रेक करू नये. विद्यार्थ्यांची गुणवत्ता ओळखून आश्वासक पालक बनणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केले. आपल्या मुलांना पालकांनी गुणवत्ता पूर्ण अनुभूती द्यावी. त्यासाठी सहलीला सहपरिवार जावं. वेगवेगळी स्थळ, प्रदर्शनांना भेटी द्याव्यात. त्यातून पाल्यांना जबाबदारीची जाणीव होईल. असे प्रतिपादन पुढे बोलतांना त्यांनी केले.
मुळातच *सहयाद्री - सभारंभाची शान* हे ब्रीद वाक्य घेऊन *गणेश उत्सव* दरवर्षी आयोजित केला जातो. यातुन कर्मचारी, अधिकारी व त्यांचे पाल्य यांना विविध कलागुण जोपासता येतात. व सादर करण्याची संधी मिळते. मुळात *सहयाद्री फार्म- सीडींग हॅपिनेस* हे  कंपनीच स्लोगन  कायमच मनात घर करून जातं.   स्लोगन नुसार सर्व कर्मचारी, अधिकारी, पाल्य व शेतकरी आनंदी राहावे, यासाठी हा प्रयत्न असल्याचा विलास शिंदे अण्णांनी या उत्सवा मागचा हेतू असल्याचा सांगितले. ऑफ द फार्मर्स, बाय द फार्मर्स, फॉर द फार्मर्स हि संकल्पना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली.
कर्मच्याऱ्यांचे पाल्य व कर्मचाऱ्यांनी नृत्य, गायन, नाट्य या विविध कला सादर केल्या. 
संचालक विलास शिंदे यांचेशी चर्चा करतांना त्यांची बुद्धिमत्ता, शिस्तप्रिय, अभ्यासू मात्र मनमिळाऊ स्वभाव भाव खाऊन गेला. सहपरिवार मोठया उत्सवात सर्वांच्या आनंदात सहभागी होऊनही मालक/ संचालक  असल्याचा कुठलाही अविर्भाव त्यांच्या वागण्यात जाणवला नाही. कदाचित या त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या स्वभावामुळेच सहयाद्री फार्मच्या प्रगतीची पताका देशविदेशात मोठया दिमाखात फडकत आहे. सह्याद्री फार्मस हि ऍग्रीकल्चर क्षेत्रातील लिडिंग इंडियन फार्मर्स प्रोड्युसर अशी अग्रेसर कंपनी असून गुणवत्ता पूर्ण फ्रेश फ्रुट्स, फ्रेश वेजिटेबल्स, प्रोसेस्ड फूड्स यासाठी कम्पणीचा सतत नाव लौकिक झळकत राहो यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

*सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

गीत:- लबाड पोरगं, स्टाईल करतं

लबाड पोरगं, स्टाईल करतं
पोरीला पाहून, स्माईल करतं llध्रुll
लबाड पोरगं.....

या केसांची हिप्पी, नाहीतर चप्पी
व्हाट्सअप, फेसबुकवर हॅपी
कधी हि स्पाईक, नवीन बाईक
ऑनलाइन न्यू, सरचिंग साईट
कमेंट देऊन, लाईक करतं ll१ll
लबाड पोरगं.....

 कॉलेजला दांडी, कॅंटीनला मांडी
मम्मी णि डॅड्डीला लावतय शेंडी
कडीमोडी जरी, दिसतेय बॉडी
सिग्नल हो तोडी, वर कुरघोडी
गॅंग बनवून, फाईट करतं ll२ll
लबाड पोरगं.......

समजतो हिरो, अभ्यासात झिरो
शायनिंग मारी, बनून हिरो
गर्ल फ्रेंड, बॉय फ्रेंड, हे नॉर्मल
रिलेशन शिप, झालीय फॉर्मल
चांगल्या डोळ्यांव, गॉगल लावतं ll३ll
लबाड पोरगं.......

 *सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

गीत: माणुसकीचे आम्ही पुजारी, माणसाला सांधू

गीत:- *माणुसकीचे आम्ही पुजारी, माणसाला सांधू*

माणुसकीचे आम्ही पुजारी, माणसाला सांधू
माणसात या देव वसे हो, आनंदाने नांदू llध्रुll
माणुसकीचे........

एक सागर एक झरा हा, भागविण्या तृष्णा
एकच वारा पाऊस धारा, भरविण्या पान्हा
एकात्मतेची आज आमच्या, शिळ घुमे काना
जात, पात णि धर्म इथले, वळचणी बांधू ll१ll
माणुसकीचे........

लाल रक्त हे एक सगळे, भूमातेचे पुत्र
काळा वा गोरा भेद नसे हे, पुज्यनिय सूत्र
जोपासण्या हो समभाव हा, वापरूया नत्र
मानवतेच्या शत्रूचा आम्ही, निषेध हो नोंदू ll२ll
माणुसकीचे.......

विज्ञान आम्हा प्रगतीसाठी, बनवूया शिडी
आधुनिक या युगामधली, आमची हि पिढी
विकासासाठी झेप आमची, उंच मारू उडी
मनामनाची गुंफून नाती, थोरांना हो वंदू ll३ll
माणुसकीचे......

 *सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® *सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक* ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१८

आले गणपती बाप्पा आले-You Tube Song

गणेश उत्सवा निमित्त बाप्पाच्या भक्तांसाठी खास गीत- *आले गणपती बाप्पा आले*.
*गीतकार सोमनाथ पगार* 9273357159
संगीतकार प्रफुल्ल तेजाळे/ राहुल रोकडे
गायक दिपक लोखंडे
Please watch, comment, share & subscribe 🙏🏻
 https://youtu.be/XWnmsepX5Hw


सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

लावणी:- * तुमच्या उसाच्या गोडीनं शहारले*


बावरले अन थोडीसी सावरले
राया, तुम्ही मला जेव्हा असे हेरले
समजत होते तुम्हा कडू कारले
तुमच्या उसाच्या गोडीनं शहारले llध्रुll
तुमच्या उसाच्या गोडीनं.....


कसदार तुमची बागायती शेती
ऐकून होते तुमची लई मी ख्याती
नाव तुमचं माझ्या काळजावरती
ऊस हा वाढलाय जोमानं वरती
तण पाहून मनी मी घाबरले ll१ll
तुमच्या उसाच्या गोडीनं......

चला एक उसाचं गुऱ्हाळ हो काढू
काकवी दोन्ही हातांनी तुम्हाला वाढू
जोरदार वाढला या उसाला तोडू
भाऱ्यावर भारे कारखान्यात धाडू
उसाच्या शेतात स्वप्नात सावरले ll२ll
तुमच्या उसाच्या गोडीनं......

*सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक 📱💻📝🎸📻🎧🎼👆