google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 14 फेब्रु, 2019

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

सहकार गीत:- सहकारातून समृद्धीकडे, झेप घेऊया गडे

https://youtube.com/user/SomnathPagar हि लिंक ओपन करून  youtube चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करण्यास नम्र विनंती💐🙏

सहकारातून समृद्धीकडे, झेप घेऊया गडे
विकासाची चळवळ मोठी, चला जाऊया पुढे IIधृII

धनंजयराव गाडगीळ, विखे पाटलांची किमया
धुरिणांची दूरदृष्टी थोर, रचिला ज्यांनी पाया
गौरवशाली भारत भुचे, ज्ञानी हे प्रस्थ बडे II१II

एकविचार, एकजुटीने, आर्थिक उलाढाल
पाषाणालाही फोडील पान्हा, सहकाराचे बळ
नवचेतना जनामनात, यशोशिखर चढे II२II

विस्तारले साम्राज्य चौफेर, सहकार आधार
उद्योग, धंदे हे उभारून, खुले संधीचे द्वार
दिनदलित, कष्टकाऱ्यांना, वाट सुखाची पुढे ll३ll

बदलून गेले हो जीवन, झाले नवनिर्माण
दारिद्र्याचे निर्मूलन अन झाले जनकल्याण
समृद्धीचा सूर गवसला, दारी रांगोळी, सडे ll४ll

स्वावलंबी झाले शेतकरी, लाभे नवी ओळख
रोजगाराच्या अनेक संधी, मिटला हो काळोख
विकसित भारताचे स्वप्न, तृप्तीचे मुखी धडे ll५ll

सोमनाथ पगार, नाशिक, गितकार/कवी, (MSRA, MABMCM)
मो.9273357159. Blog:- https://somnathpagar.blogspot.com
E-mail: somnathapagar@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in
©®सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक
Follow me on my Blog, Whatsapp, Facebook, Twitter, Linkedin, Instagram.
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar 

अभंग:- जन्माचे हे सार

https://youtube.com/user/SomnathPagar हि लिंक ओपन करून  youtube चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करण्यास नम्र विनंती💐🙏

अभंग:- जन्माचे हे सार

करावा संसार l थोडे उपकार
जन्माचे हे सार l असते हो llll

अमर हो व्हावे l जगून मरावे
मरून उरावे l कर्मानेची llll

सदा झिजवावी l नश्वर हि काया
फुकाचीच माया l ध्यानी ठेवा llll

एकदाच जन्म l माणुसकी धर्म
मागे राही कर्म l सत्य हेची llll

माय बाप थोर l जगी या दैवत
ठेवूया मनात l जन सारे llll

पत्नी मूलं सारे l सह प्रवाशी हे
सगे सोयरे हे l दागिने हो llll

लहान नी थोर l मनाचा हा भ्रम
शेवटी मुक्काम l स्मशानी हा llll

मुखी गोड बोल l जन्म करा सार्थ
मित्र हेची पार्थ l सोमनाथा  llll

सोमनाथ पगार, नाशिक, गितकार/कवी, (MSRA, MABMCM)
मो.9273357159. Blog:- https://somnathpagar.blogspot.com
E-mail: somnathapagar@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in
©®सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक
Follow me on my Blog, Whatsapp, Facebook, Twitter, Linkedin, Instagram.
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar 

अभंग:- सुखी सासरी या

https://youtube.com/user/SomnathPagar हि लिंक ओपन करून  youtube चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करण्यास नम्र विनंती💐🙏

अभंग:- सुखी सासरी या

सासूर वाशीन l नावाची मी खरी l
एकतात सारी l शब्द माझा llll

येईना आठव l माहेरचा मला l
आधार जीवाला l सासरचा llll

स्वप्नांचे हे पंख l विहरते मुक्त l
होते सदा व्यक्त l मनाने मी llll

स्रीचा जन्म माझा l आनंदी आयुष्य l
घराचे भविष्य l माझ्या हाती llll

चार भिंतीत मी l होते कधी तरी l
आज हाती दोरी l संसाराची llll

पती पत्नी दोघ l जणू छापा काटा l
उचलतो वाटा l सामान हो llll

माहेर सासर l मज हे समान l
दोन्ही कडे मान l मिळतो हो llll

जाता माहेरास l सासरची आस l
होई सदा भास l सासरी मी llll

घ्याया नको येऊ l मला भाऊ राया l
सुखी संसारी या l सदा मी रे! Llll

धुण्या-भांडया साठी l बाई कामवाली l
माझ्याच हवाली l घर माझे ll१०ll

सोमनाथ पगार, नाशिक, गितकार/कवी, (MSRA, MABMCM)
मो.9273357159. Blog:- https://somnathpagar.blogspot.com
E-mail: somnathapagar@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in
©®सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक
Follow me on my Blog, Whatsapp, Facebook, Twitter, Linkedin, Instagram.
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar 

अभंग:- बाप माझा राजा

https://youtube.com/user/SomnathPagar हि लिंक ओपन करून  youtube चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करण्यास नम्र विनंती💐🙏

अभंग:- बाप माझा राजा

बाप माझा राजा l हुबेहूब आजा
होणे नाही दुजा l जगा मधी llll

दमुनिया रोज l बाप टाकी धाप
कष्ट वारे माप l रोज करी llll

निष्टुर हे जग l मिळे ना हो दाम
मातोमोल घाम l बापाचा हो llll

आम्हा मुलांसाठी l बाप हाच देव
आम्हा नाही भेव l कशाचेही llll

जगाचा पोशिंदा l औत घेई हाती
पिकवितो मोती l शेतामधी llll

जिवनाची शाळा l बाप सादा भोळा
रोजच सोहळा l बापामुळे llll

देशात या माझ्या l लोकशाही मोठी
उपाशी हि पाटी l आयुष्याची llll

सोमनाथ म्हणे l मी हो धनवान
बाप गुणवान l लाभला हो llll

सोमनाथ पगार, नाशिक, गितकार/कवी, (MSRA, MABMCM)
मो.9273357159. Blog:- https://somnathpagar.blogspot.com
E-mail: somnathapagar@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in
©®सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक
Follow me on my Blog, Whatsapp, Facebook, Twitter, Linkedin, Instagram.
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar 

अभंग:- वारी पंढरीची

https://youtube.com/user/SomnathPagar हि लिंक ओपन करून  youtube चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करण्यास नम्र विनंती💐🙏
अभंग:- वारी पंढरीची

निरंतर चालू l वारी पंढरीची ll
पिडा हो कुणाची l टळली का llll

करुनिया स्नान l चंद्रभागा मधी ll
जीवनाची चांदी l कुणाची हो llll

भरते तिजोरी l वर शिरजोरी ll
लागतेच बारी l दर्शनाशी llll

देवाचिया दारी l देता नोट साधी ll
दर्शनास संधी l मिळते हो llll

सारे तीर्थ क्षेत्र l कसे धनवान ll
गरीब हे जन l उपाशी का llll

पावेल का देव l कोणी जरा सांगा ll
वाहिल का गंगा l पुण्याईची llll

पाझर फुटावा l देवा आता तरी ll
मिटवावी दरी l लाचारी हि llll

गरीबांचे वाली l देव ना शासन ll
स्वप्न अच्छे दिन l कायमचे llll