लावणी: अहो! या आंब्याचा रस लई गोड
आला आंब्याचा, आला की हो हंगाम
तुम्ही पाव्हनं, झालं का घामाघूम
अहो! या आंब्याचा, रस लई गोड
जरा चवीनं, खावा कि हो हि फोड llधृll
अहो! या आंब्याचा,,,
झाड वाढलं, लई हिरवं गार
पाणी पाऊस, यानं सोसलं फार
मोर बहरला, याला जोमदार
झाडाला शिवतं, हे चावट वारं
लई भक्कम आधार, देतंय खोड ll1ll
अहो! या आंब्याचा,,,,
साऱ्यांची नजर, हि या आंब्यावर
आंब्याची कोय हि, या जीवाला घोर
या तुम्ही भी खावं, गुन गाणं गाव
जीभ चाटीत, डोळे मिटून रहावं
अहो! गोड ओठांनी चावा कि थोडं ll2ll
अहो! या आंब्याचा,,,,
साऱ्यांना सांगा, हा चवदार आंबा
भरली साखर, या चाखाया थांबा
चैत्राच्या उन्हात, आनंद मनाला
थोडसं थांबा कि, घाम का अंगाला
आंबा खाण्याची, तुम्हा जुनी हि खोड ll3ll
अहो या आंब्याचा,,,
सोमनाथ पगार, नाशिक
गीतकार/कवी (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
सभासद:
स्क्रीन रायटर्स असोशियशन
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
महाराष्ट्र साहित्य परिषद
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏