google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 2015

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

गीत- बेधुंद झालो

मित्रानो!
हे गीत मी सोमवार दि.14 सप्टेम्बर 2015 रोजी पहाटे 4.45वा फक्त 10 मिनिटात लिहले आहे. कधी कधी एखादी रचना काही मिनिटात लिहली जाते तर कधी कधी काही दिवस, काही महीने तर कधी कधी वर्षानुवर्षे ती रचना मनात वा कागदावर अर्धवट रुपात असते. आणि मग वेळ आल्यावर पूर्ण होते किंवा होतही नाही.
जाग आली. मनात विचारांचा महापुर आला. कागद पेन घेउन रीता झालो तेव्हा कुठ हायस वाटल.
प्रसव वेदना व्हाव्या तश्या वेदना कविता कधी कधी देते. लिहून झाल्यावर मन मोकळ होत.
गीत- बेधुंद झालो
बेधुंद झालो मी, तूला नयनी पाहुनी
एकटाच उरलो, ह्रदय तुला वाहुनी !!ध्रु!!
जीवघेणी वेणी, अन कर्णफूल कानी
विश्वकर्मा जणु, तुला घडवले कोणी
निशब्द झालो, झाले तुझे गीत गाउनी !!1!!!
डोंगर ,दरया ,आभाळ, हि तली साचली
फुले ,पक्षी, वेलीही, मनसोक्त नाचली
सारे धन्य झाले ,रूप हे तुझे पाहुनी !!2!!
अशी हसली ,जशी बिजली कडाडली
तू अशी बोलली, जशी तोफ धडाड्ली
तुझी एकेक अदा ,गेली आग लाउनी!!3!!
रंग रूप नक्षिदार, रांगोळी काडली
अंग तंग हे ,झाडावर वेल वाडली
जगण्याचा अर्थ गेली समजाउनी !!4!!
सोमनाथ आ पगार, नाशिक
गीतकार/ कवि
मो 9273357159
ईमेल somnathapagar@gmail.com

गीत- आले गणपत्ती बाप्पा

गीत- आले गणपत्ती बाप्पा
आले गणपत्ती बाप्पा आपल्या घरी
घेउन सुख शान्ति अन समृद्धि भारी !!ध्रु!!
रामाच्या प्रहरी उठून सारी
झाली सारी ही तयारी
कशाला चिंता दुखाची आता
बाप्पाची महिमा हो न्यारी !!1!!!
आनंदी झाले सारे जन मनी
बाप्पच्या या उत्सव क्षणी
वाजत गाजत नाचत आले
ढोल ताश्यांचा गजर या नगरी !!2!!
आरती सकाळ संध्याकाळ
पूजा मोदक दुर्वा वाहून
सर्वा भरपूर बाप्पा देइन
आरोग्य सन्तति संपत्ति भारी !!3!!
सोमनाथ आ पगार, नाशिक
गीतकार/ कवि
मो 9273357159
ईमेल somnathap agar@gmail.com

देव कुलपात बंद

नाशिक शहरातील प्रदीर्घ वास्त्व्यानंतर काल प्रथमच नारोशंकराच्या मंदिरात दर्शनाचा योग आला
तेथील मंदिराची अवस्था पाहून मी अस्वस्थ झालो
त्याचाच परिपाक ही आजची कविता आहे. 
कुम्भमेल्यातही हे मंदिर दुर्लक्षित राहिले. 

देव कुलपात बंद

माझ्या भारत देशात
देव कुलपात बंद
तरीही भक्तिचा पुर
चरणी माथा हां छंद !!1!!
देवाच्या दानपेटिची
होते राजरोस चोरी
पायरीवर याचक
होई का सुखी भिकारी !!2!!
पै पैका जमा करून
मंदिरी सजे कळस
पाण्या विण येथे सुके
गरीबा घरी तुळस !!3!!
नाव ते जाणण्या साठी
मंदिरावर  ती पाटी
प्राथना सुरु ही मनी
वाजते मंदिरी घंटी !!4!!
पित्र श्राद्ध मेल्यावर
जीवंत पणी उपाशी
कावळे   तृप्त होउनी
लाभे कुणा पुण्य राशि !!5!!
माणसातल्या देवाची
पूजा माणूस पणाने
देवही जागा देवळी
होइल देव पणाने !!6!!
सोमनाथ आ. पगार
नाशिक मो 9273357159
ईमेल somnathpagar@gmail.com
ब्लॉग somnathpagar.blogspot.com

बुधवार, ६ मे, २०१५

कळले मुळlत मित्र माझा मीच अनुभव हीच खरी सखी

प्रसिद्ध कवि श्री कमलाकर देसले अर्थात सर्वांचे लाडके आबा यानी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडल व् कुसुमाग्रज प्रतिष्टा न आयोजित काव्यलेखन कार्यशा लेत सहभागी कविना गृहपाठ म्हणून सुरवातीच्या दोन ओळी देऊन काव्यलेखन करावयास सांगितले त्या ओळी वर आधारित अभंग प्रकारातील मी लिह्लेलेले काव्य आबांच्या प्रेरणेनेे

कळले मुळlत
मित्र माझा मीच
अनुभव हीच
खरी सखी || ध्रु||


भेटले बहोत
कळले क्षणात
काय हो मनात
दुश्मनांच्या||1||

टाकिचे घाव
मग देवपण
आली मज जाण
स्पर्धा जगी ||2||

लागता हो ठेच
मनी का कुडावे
जपून चडावे
पायरी ही ||3||

कायम सोबती
इथे नसे कोणी
रोज नवी वाणी
एकावी ती ||4||

कुणा दोष द्यावा
जशी आहे दृष्टी
तशी दिसे श्रुष्टि
ठसे मनी ||5||

जगण्याची रित
मीच माझा मात्र
बाकी सारे गोत्र
नावाचेच ||6||

सोमनाथ आ. पगार
नाशिक (चांदवड )
somnathapagar@gmail.com
www.somnathpagar.blogspot.com

जाग ए इंसान, काला हो गोरा कोई

जाग ए इंसान, काला हो गोरा कोई
खून का रंग एक, सब है भाई भाई
मची भगदड़ जब भी मुसीबत आयी
बचाने आये इंसान, हिन्दू न इसाई!!ध्रु!!

जब आया भूकंप,हर तरफ तबाही
पक्की सड़के, खंडहर इमारत ऊँची
न बचाने आया, मशिहा न नानक
न राम रहीम, न ही कोई साईं !!1!!

काम न आये नमाज न क़ोई भजन
ना बचती मस्जिद, ना मंदिर कोई
जब लतपथ खुनसे हो जाए धरती
पता चले एक खुन्वाले हम है भाई !!2!!

न बाइबल, न कुराण,न ही रामायण
बचाने वाले का धर्म न होता कोई
भाईचारा अंतिम सत्य कहे विज्ञान
ना मतभेद, ना अपना पराया कोई!!3!!

ना कोई हिन्दु हो,ना कोई मुस्लिम
ना कोई सिख हो, ना कोई इसाई
कोई धर्म ना हो, ना कोई जाती
मिलकर रह सकेंगे तब बनके भाई!!4!!

सोमनाथ आ. पगार
नाशिक
मो 9273357159
somnathapagar@gmail.com
www.somnathpagar.blogspot.com

गुरुवार, १९ मार्च, २०१५

Lecturer in English, Polytechnic Teachers Services -GR -A

मित्रानो !!
मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेतल्या गेलेल्या परीक्षेत अधिव्याख्याता, इंग्रजी, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट -अ (Lecturer  in  English, Polytechnic Teachers  Services -GR -A ) या पदासाठी जुलै २०१४ मध्ये उत्तीर्ण झालो आहे.
दरम्यानच्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे निवड यादी, शिफारस पत्र प्राप्त झाल्यावर उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे कडून कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली असून  सद्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे.

माझ्या या यशात माझे गरीब, कष्टाळू व प्रामाणिक आई-वडिलांचे काबाड कष्ट, त्यांचे सत्कर्म, माझी भावंड, माझी पत्नी, माझी मुले, मित्र मंडळी यांची साथ, मला लाभलेल्या शिक्षकांची शिकवण, आप्तेष्टांचे  शुभाशिर्वाद  तसेच आयुष्याच्या महत्वाच्या टप्यावर मला भेटलेले क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य माझे पितृतुल्य मा. देवधर सर, देवधर बाई, त्यांची मुले शिरीष दादा, कौस्तुभ भाऊ, मृणालिनी ताई यांचे योग्य  वेळी मिळालेले योग्य मार्गदर्शन व आधार हा माझ्या आयुष्यात turning point ठरला.   त्याचप्रमाणे डॉ. नांदुरकर  सर, डॉ. कुशारे सर, प्रा.  बंदी सर,  प्रा. कडवे सर, प्रा. कोकाटे सर, डॉ. बर्वे सर, मुरारी सर,  डॉ. कुटे सर, जाधव सर, कांडेकर सर, (अगणित नावे नमूद करण्यासारखी आहेत)  या सर्वांनी वेळोवेळी केलेले सहकार्य, मार्गदर्शन आणि आदरणीय भाऊ, दादा यांची प्रेरणा व आदर्श यामुळेच मी इथपर्यंत पोहचू शकलो . या सर्वांचे ऋण मी या जन्मात काहीही केले तरी फेडू शकणार  नाही. आणि मी तसे करूही इच्छित नाही कारण मी सदैव्य या  सर्वांच्या ऋणातच  राहू इच्छीतो.

मला आजही आठवत, मी सर्वप्रथम "What  are  you  searching  for?"  हे वाक्य मा. देवधर सरांशी बोलताना बरोबर   बोलल्यावर सराना किती आनंद झाला होता. सर व बाई  वेळोवेळी मला  अभ्यासाठी मदत करायचे, मी  लिहलेल्या कवितांबद्दल  मार्गदर्शन करायचे . मा. देवधर सर व शिरीष दादांनी जर मला  मदत केली नसती तर कदाचित माझ शिक्षणही अर्धवट राहिलं असत. मी जेव्हा MCVC  परीक्षेत नाशिक बोर्डात बारावा तर पंचवटी महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो तेव्हा सर्वाधिक आनंद  त्यांनाच झाला होता. खर म्हणजे जीवनात ध्येय काय असत?  हे त्याच्यामुळेच मला समजले.  (आजही माझ्या अशिक्षित  आई-वडिलाना मी काय शिकलोय?, काय काम करतोय?  हे सांगता येत नाही)

त्याचप्रमाणे मी एकदा  "I  am  popular  as  …." असं  एका अर्जात लिहलेले पाहून मा.  डॉ. बर्वे सरांनी मला शब्दशा अर्थ समजावला व पत्र कसं  लिहावं  हे सांगितले. त्यांच्यामुळेच मला  vocabulary,  dictionary चे महत्व समजले.

मा.  डॉ. नांदुरकर  सरांनी  माझ्याकडून  एकदा मोठ्या विश्वासाने translation करण्याचे काम करून   घेतल्याने मला माझी पात्रता सिद्ध करता आली, त्यामुळे   माझा आत्मविश्वास वाढण्यास मदतच झाली.

डॉ. कुशारे सरांकडून तांत्रिक ज्ञानासह विभागात शिस्त बद्ध परंतु healthy  वातावरण कसे असावे याच बरोबर उत्तम  d rafting (notice , letter) शिकलो.

मा. प्रा.  बंदी  सरांकडून कार्यक्षमता कशी असावी, हे  शिकायला  मिळाले.

मा. प्रा. कडवे सरांमुळे  उत्तम प्रशासक कसा असावा हे समजले. . .

अश्या रीतीने प्रत्येकाकडून मला काही ना काही शिकायला मिळाल्याने  मी  यशस्वी होऊ शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे.
थोडक्यात माझ्या जडणघडणीत व वाटचालीत क. का. वाघ शिक्षण संस्थेतील अधिकारी, कर्मचारी,  मला लाभलेले सहकारी यांचा सिंहाचा वाटा आहे. आज मी जो काही घडलो तो केवळ या  सर्वांचे आदर्श, सहकार्य व मार्गदर्शनामुळेच यात तिळमात्र शंका नाही.

मागे वळून, आयुष्यात डोकावून पाहतांना,आत्मपरीक्षण केल्यावर जाणवते कि, माझ्या करिअरचा / आयुष्याचा प्रवास खरोखरच खडतर होता. तरी सुद्धा संकटाचा मुकाबला करत परिस्थितीशी दोन हात केले. वह्या पुस्तके एवढच काय साधी पेनची रिफील मिळण अवघड होत,  ना  अंगावर धड कपडे होते, दोन वेळच्या अन्नाची भ्रांत होती (साधारणता वीस - पंचवीस वर्षापुर्वीचा काळ)  अशा परिस्थितीत   उच्च शिक्षण घेण  हे तर स्वप्नच होते.  वेळेप्रसंगी मोलमजुरी, कामधदा करून इथवर पोहचलो . मी  कोठून प्रवास सुरु केला व कुठवर पोहचलो हा विचार मनात आल्यावर जाणीव होते  कि मी जर के. के. वाघला नसतो तर?  आज कोठे असतो? ………………. हि कल्पनाही करवत नाही.

या संस्थेत माझा आजवरचा जवळपास   २१ वर्षाचा  प्रवास वेटर म्हणून सुरु झाला, त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात  शिपाई, सद्या  तंत्रानिकेतानला  तांत्रिक सहाय्यक (विद्युत अभियांत्रिकी) आणि  आता  शासकीय तंत्रानिकेतानला इंग्रजीचा अधिव्याख्याता (Lecturer  in  English) होणार,  असा आहे. मला मिळालेले सर्वांचे सहकार्य, मार्गदर्शन व मदत याबद्दल मी सर्वांचा शतशा  आभारी आहे.

Somnath A. Pagar
Tech. Asst. Electrical Engg.
 K.K.Wagh Polytechnic,Second Shift,
 Amrut Dham, Panchvati, Nashik-3
 Mb.9273357159

Blog :-www.somnathpagar.blogspot.com 

आभार पत्र -मा. श्री . ग. दि. कुलथे साहेब

 प्रति ,
मा. श्री . ग. दि. कुलथे साहेब,
महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघ,
महाराष्ट्र .

मा . महोदय ,
अधिव्याख्याता इंग्रजी , शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट -अ (उच्च व तंत्रशिक्षण विभाग ) या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गुणवत्तेनुसार आमची उमेदवारांची निवड झालेली असून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून आमच्या प्रमाण पत्रांची तपासणीही पूर्ण झाली आहे . पुढील कार्यवाहीसाठी तसेच नियुक्तीसाठी आम्ही सर्वजण वाट  पाहत आहोत.
सोमवार दि . १७ /११/२०१४ रोजी माझे आपल्याशी दूरध्वनी द्वारे झालेल्या संभाषणा नुसार  माझे सहकारी मित्र प्रा . राम पाटील व प्रा . भीम कुंटे हे आपणास भेटावयास आले असता आपण केलेले मार्गदर्शन निश्चितच  आम्हा सर्वांना प्रेरणादायी व आमचा आत्मविश्वास वाढवणारे ठरले आहे .
आपण खायला दिलेली संत्री आम्हासाठी संस्मरणीय ठरली . अत्यंत सचोटीने काम करून व विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देवून उद्याची भावी पीडी घडवण्यास आम्ही कटिबद्ध अहोत. प्रगतीपथावर असलेल्या आपल्या महाराष्ट्राच्या वाटचालीत आमचा खारीचा वाटा  निश्चित  राहणार आहे याबाबत शंकाच नाही . यापुढेही आपल्या मार्गदर्शनाखाली आमची कारकीर्द व वाटचाल निश्चित यशस्वी होईल याची आम्हाला शाश्वती आली आहे .
आम्ही सर्व जण  आपले आभारी आहोत .
आपला विश्वासू

सोमनाथ आवडाजी पगार
Mo. No.  ९२७३३५७१५९
Email -somnathapagar @gmail.com
            somnathpagar @yahoo.co.in
Blog - www. somnathpagar.blogspot.com 





Somnath A. Pagar Tech. Asst. Electrical Engg. K.K.Wagh Polytechnic,Second Shift, Amrut Dham, Panchvati, Nashik-3 Mb.9273357159