लावणी- फिरवला कंगवा केसांवर
पहा बाई साजन थांबला माझा
बाई ग! राया माझा दिलाचा राजा
फिरवला कंगवा केसांवर जरा
मजवर भिरभिरल्या या नजरा ॥ध्रु॥
नार मी अशी, बाई ग! फूल कळी
नजर लागे मला, लई मी भोळी
जगाची रित, केळली अशी प्रित
कस मला नव्हत, माहीत काही
केसामधी जसा, लाजला गजरा ॥१॥
दोन्ही हातांचे, घालुनी गळा हार
गालावर लाली, नजर कटयार
मानू मी कशी, या प्रेमामधी हार
नजरेचे वार, जिंकल ते सार
क्षणामधी बदलला, हा नखरा ॥२॥
तरुण वयात, आली मज लाज
साजश्रृंगार, मी ही सजले आज
मनात हुरहुर, कसली लाज
सावज हेरल, रूप माझ साज
आज खुला केला, दिलाचा पिंजरा ॥३॥
© सोमनाथ आ. पगार
गीतकार/कवि
नाशिक
Mb. No. ९२७३३५७१५९
Blog-www. somnathpagar.blogspot.com
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo. co. in