google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 2021

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

भाडेकरी व घरमालक यांच्यातील करारनामा कसा असावा याचा नमुना

सदर भाडेकरी करारनामा हा रु. ५००/- च्या  Indian Non Judicial Stamp वर तथापी कायदेशीर सल्ला घेवून नियमाप्रमाणे योग्य रक्कमेच्या Stamp वर प्रिंट करण्यात यावा.

तसेच सदर माहिती हि केवळ माहितीस्तव असून प्रत्यक्ष करारनामा कायदेशीर सल्ला घेवून कायदेशीर मार्गाने करण्यात यावा. 

करारनामा

 करारनामा आज दिनांक माहे ऑक्टोबर सन २०२१ रोज शुक्रवार ते दिवशी नाशिक मुक्कामी...

श्री. मनाथ आवडाजी पगार

वय-४४ वर्षे, धंदा-नोकरी.

राहणार- १, वैष्णवी विहार, सिद्धेश्वर नगर रेशिंबंध लॉन्स मागे, हिरावाडी,

मो.क्र.९२७३३५७१५९.

लिहून घेणार

 

         -यांसी-

 

श्री. विष्णू बळीराम गायकवाड

वय- ५० वर्षे, धंदा- पेंटिंग काम.

राहणार- वार्ड नंबर- ८, मुक्काम पोस्ट- मालेगाव, नवीन मालेगाव,

मो.क्र.९८८१९४५९२१.

लिहून देणार

 कारणे करारनामा लिहून देतात तो ऐसा जे की :- 

०१) मिळकतीचे वर्णन:- तुकडी जिल्हा नाशिक, पोट तुकडी तालुका नाशिक, पैकी नाशिक शहरातील व नाशिक महानगरपालिका हद्दीतील गोपाळ नगर मधील अमृतधाम, पंचवटी परिसरातील मौजे नाशिक या गावचे शिवारातील मिळकतीचा सर्वे नं. २४८/३/२/१ ची पुरवणी या लेआउट प्लान मधील प्लॉट क्र. ६० यांसी क्षेत्र ३६.६१ चौरस मीटर या वरील रो-हाऊस क्र.एच-४, चे बांधीव क्षेत्र २१.०० चौरस मीटर व १५.६१ चौरस मीटर गार्डन स्पेस यांसी चतुसीमा रेकॉर्ड ऑफ राईट प्रमाणे. 

येणेप्रमाणे चतु:सिमेतील दरोबस्त प्लॉट्सह बांधीव रो-हाऊस मिळकत त्यात सर्व सुख सोयींसह वनरूम किचन, संडास, बाथरूम, मागेपुढे असलेल्या जागेसह तसेच इलेक्ट्रिक मिटर, पाण्याचे मीटर व पाईप लाईनसह रो-हाउस मिळकत.

 ०२) वर कलम ०१ यात वर्णन करण्यात आलेली मिळकत ही लिहून घेणार यांचे मालकीचे असून लिहून देणार यांना त्यांचे निवासा करिता जागेची गरज असल्याने त्यांनी सदरची मिळकतीची लिहून घेणार यांचेकडे मागणी केली. त्यानुसार उभयतांमध्ये आज रोजी करारनामा अस्तित्वात येत आहे सदर करारनाम्याच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत,

अटी व शर्ती

१) एक लिहून घेणार व देणार यांचे उभयतांमध्ये मुंबई भाडे नियंत्रण कायद्यानुसार घरमालक व भाडेकरू असा संबंध राहणार नसून उभयतांमध्ये लिहून घेणार व लिहून देणार असा संबंध राहील.

 २) सदरच्या मिळकतीची परवाना फी ही लिहून देणार यांनी दरमहा रक्कम रु.१०००/- (अक्षर रुपये एक हजार मात्र) देण्याचे ठरविण्यात आलेले आहे.

३) लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना सदरच्या मिळकतीचे वापराबाबत अनामत रक्कम रु. १००००/-  (अक्षरी रुपये दहा हजार मात्र) इतके द्यावयाचे ठरले असून आज रोजी सदर रक्कम रोख अदा केली आहे. सदरची रक्कम ही करारनाम्याची मुदत संपल्यावर एक रकमी लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना बिनव्याजी परत करावयाचे आहे.

 ४) सदरची फी लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना दरमहा दहा तारखेच्या आत रोख स्वरूपात अदा करावयाची आहे. सातत्याने तीन महिने परवाना फी लिहून देणार यांनी अदा न केल्यास सदरचा करारनामा आपोआप रद्द होईल. लिहून घेणार हे लिहून देणार यांनी जमा केलेली अनामत रक्कमेमधून सदरची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम लिहून लिहून देणार यांना अदा करून सदरच्या मिळकतीचा ताबा घेण्याचा हक्क लिहून घेणार यांना राहील.

 ५) सदरचा करारनामा हा दिनांक ऑक्टोबर २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२२ पावेतो म्हणजेच ११ महिने मुदतीकरिता अस्तित्वात राहील. त्यानंतरचा करारनामा आपोआप संपुष्टात येणार असून त्यासाठी वेगळा दस्त करण्याची गरज नाही.

 ६) लिहून देणार यांनी सदरचे रो हाऊस वापरताना लगत असलेल्या रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे इमारतीस धोका पोहोचेल अशा प्रकारचे कोणतेही स्फोटके किंवा तत्सम पदार्थ बाळगवयाचे नाही.

 ७) सदरचे रो-हाउस वापरतांना येणारे वीज बिल व पाणी बिल हे लिहून देणार यांनी दरमहा वेळोवेळी भरावयाचे असून इतर महानगरपालिकेचे सर्व ते कर टॅक्सेस लिहून घेणार यांनी भरावयाचे आहेत. 

८) सदरच्या करारनाम्याची मुदत ही अकरा महिन्यांची असून लिहून देणार यांना त्याअगोदर सदरचा करारनामा रद्द करावयाचा असल्यास अगर लिहून घेणार यांना सदरचा करारनामा मुदती अगोदर रद्द करावयाचा असल्यास उभयतांनी त्याकरिता एकमेकास एक महिना आगाऊ लेखी नोटीस अथवा तोंडी सूचना द्यावयाची आहे.

 ९) लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना जे रो-हाऊस करारनाम्याने दिलेले आहे, ते पूर्णपणे सुस्थितीत असून त्याच स्थितीत लिहून देणार यांनी सदरचा करारनामा संपतेवेळी लिहून घेणार यांना सदरच्या मिळकतीचा ताबा द्यावयाचा आहे.

 १०) लिहून देणार यांनी लिहून घेणार यांचे संमतीशिवाय सदरचे रो-हाऊस मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जो कायमस्वरूपी अस्तित्वात राहील असा करावयाचा नाही. अर्थात सदरच्या मिळकतीमध्ये कुठल्याही प्रकारचे बांधकाम, तोडफोड करावयाचे नाही. कोणत्याही प्रकारची तुटफुट अगर नुकसान झालेले आहे, असे लिहून घेणार यांचे निदर्शनास आल्यास लिहून घेणार यांचेकडे जमा असलेल्या अनामत रकमेतून सदरच्या तूटफुट अगर नुकसानीचा खर्च वसूल केला जाईल व शिल्लक अनामत रक्कम परत केली जाईल.

 ११) सदर मिळकतीत लिहून देणार हे राहत असताना मुंबई भाडे नियंत्रण कायदा व त्या अंतर्गत असणाऱ्या इतर पोट कलमान्वये लिहून देणार यांना भाडेकरू म्हणून कुठल्याही प्रकारचे हक्क सदर मिळकतीवर प्राप्त करता येत नाही. हे लिहून देणार यांना मान्य व कबूल आहे.

 १२) सदर मिळकतीच्या करारनाम्याची मुदत संपताच मी लिहून देणार सदर मिळकत विनातक्रार खाली करून देईल. यदाकदाचित ठरलेल्या मुदतीत मिळकत खाली करून दिली नाही तर तुम्ही माझे विरुद्ध योग्य ती कायदेशीर फौजदारी कारवाई करून त्याकामी येणाऱ्या खर्चास व परिणामास मी स्वतः जबाबदार राहील. असे या करारनाम्यावेळी  मान्य व कबूल करतो.

 १३) सदरचे रो हाऊस लिहून देणार यांना निवासी वापराकरिता दिलेले असून सदरच्या मिळकतीचा वापर हा त्यांनी फक्त निवासी उपयोगाकरिता करावयाचा आहे. त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा बेकायदेशीर वापर सदर मिळकतीचा करावयाचा नाही. यदाकदाचित अशा प्रकारची काही तक्रार आल्यास अथवा  बेकायदेशीर कृत्य केल्याचे आढळल्यास व त्याबाबत काही फौजदारी कारवाई झाल्यास त्याचे खर्चास व होणाऱ्या परिणामास लिहून देणार हे  स्वतः जबाबदार राहतील. हे लिहून देणार यांना मान्य व कबूल आहे

 १४) सदर मिळकतीत राहत असताना लिहून देणार यांना पासपोर्ट काढणे, कार/ मोटर सायकल घेणे, कार/ मोटरसायकल लायसन्स मिळवणे, बँकेत खाते उघडणे, टेलिफोन, मोबाईल घेणे/ ट्रान्सफर करणे, नवीन गॅस कनेक्शन घेणे/ ट्रान्सफर करणे व इतर खाजगी, सरकारी-निमसरकारी कामकाजासाठी वरील मिळकतीच्या पत्त्याचा पुरावा (ऍड्रेसप्रूफ) म्हणून वापर करण्यास लिहून घेणार यांची संमती आहे. परंतु मिळकतीच्या पत्त्याचा बेकायदेशीर वापर झाल्यास तो मालक व सदर मिळकतीवर बंधनकारक  राहणार नाही.

 सदरचा करारनामा हा आज रोजी उभयतांनी राजीखुशीने स्वसंतोषाने कोणत्याही धाक, दडपणास बळी न पडता साक्षीदारांसमक्ष लिहून ठेवला असे.

येणेप्रमाणे करारनामा.

 

ठिकाण

तारीख:-०८/१०/२०२१  

 

 

लिहून घेणार

यांचा फोटो 

 

 

                 श्री. सोमनाथ आवडाजी पगार

                 लिहून घेणार

 

  लिहून देणार

यांचा फोटो 

 

                श्री. विष्णू बळीराम गायकवाड

                लिहून देणार

साक्षीदार:-

१)

 

 

२)

 

 

 

शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

गळून पडला गर्व आणि मोडून गेला कणा

 माझ्या *माणूस झाला गोगलगाय* या आगामी काव्यसंग्रहातून


*तुम्ही लवकर बरे व्हावे*

*करण्यास प्रार्थना*

*जपले का काळजात सांगा*

*आजवरी हो कुणा?*


*सोमनाथ पगार, गीतकार/कवी, मो. ९२७३३५७१५९*


*कविता आवडल्यास कृपया, नावासह फॉरवर्ड करण्यास विनंती*🙏🏻💐

कोरोनाच्या संसर्गामुळे अवघे जग हादरून गेले असून अनेकांना प्रादुर्भाव झाला आहे किंवा होतो आहे. कुणाला संसर्ग झाल्यावर  त्या रुग्णासाठी *परमेश्वरा .... ला लवकर बरे कर* अशी प्राथना किती बरं लोकं करत असतील? हा विचार मला विचारात पाडून गेला. आणि हे त्या व्यक्तीच्या आजवरच्या वागण्यावर अवलंबून आहे. असं मनमोन वाटले. 

प्रादुर्भाव होणाऱ्या व्यक्तीपासून प्रत्येक जण चार हात दूरच राहण्याचा प्रयत्न करतोय. एकूणच सर सलामत तो पगडी असं वागावं लागणारा हा जमाना.

संपत्ती, पैसा, अडका, पद, प्रतिष्ठा, ताकद या बळावर जर *मी म्हणजे सर्वव्यापी* असे समजून इतरांचा अपमान करणाऱ्या, इतरांना त्रास देणाऱ्या व्यक्तीसाठी खरंच कुणीतरी मनोमन सदिच्छा व्यक्त करत असेल की?.....आणि मग या विचारातून या कवितेची निर्मिती झाली....


*गळून पडला गर्व आणि*

*मोडून गेला कणा* 

*शेवटाला तरी माणसाला* 

*माणूस तुम्ही म्हणा*


दवाखाण्यात भरती होता

नसता तुम्ही कुणी

एक सामान्य रुग्ण बेजार

वेदनेचेच धनी


*तुम्ही लवकर बरे व्हावे*

*करण्यास प्रार्थना*

*जपले का काळजात सांगा*

*आज वरी हो कुणा?*


होता अधिकारी मोठ्या पदी

बुद्धीमान वाचक

कोरोच्या विळख्यात जाता

दयनीय याचक


*किड्या मुंग्या गत हे जीवण*

*कळले कधी नाही* 

*क्षण भंगुर श्वास उसने*

*उद्याची ना ग्वाही* 


उगा बडे जाव नी प्रतिष्ठा

संपत्तीची ही नशा 

गोर, गरीबा देता यातना

होई आनंद कसा ?


*विकासाचा भस्मासुर जणू*

*मोहाचा जणू फास* 

*अति तेथे माती होत असे*

*ठरलेला विनाश* 


संसर्ग होता महारोगाचा

दूर आप्त, सोयरे

अंतर राखूनी दूरवरी

वाहती गार वारे


*नयनी येतील अश्रू ज्यांच्या*

*मित्र असले जोडा*

*कर्म करावे असे जगी की*

*गर्व नसावा थोडा*


संकट समयी धाव घ्यावी

फुटू द्यावा पाझर

न द्यावे काळजावर चरे

पेरू चला साखर


*कृपया*,


https://youtube.com/user/SomnathPagar


हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. तसेच  https://somnathpagar.blogspot.com

हा Blog *Follow* करून *Subscribe*  करण्यास विसरू नका.

💐🙏

*तुमचे एक सब्सक्रिप्शन*

*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

! (MSRA, MABMCM) Mb.9273357159

Email-somnathapagar@gmail.com  

somnathpagar@yahoo.co.in

Follow/ Subscribe me on my Blog, Youtube Channel,  Facebook, Whatsapp, Twitter, Linked in, Instagram, SoundCloud.

सभासद:

१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

२.स्क्रीन राइटर्स असोसियशन

३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

४.मराठी साहित्य परिषद


💐 *Feel free to contact for Promotion on YouTube Channel, Blog, etc.*💐


©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

मंगळवार, ३० मार्च, २०२१

बाल कविता:- मूल हसतं घर सजतं

*सन्मानीय साहित्यिक बाबा जाधव उर्फ मारुती जाधव सर*

आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻💐
सर, आपण संपादित केलेल्या तथा पद्मरत्न या प्रकाशन संस्थेद्वारा प्रकाशित केलेल्या *हरवलेले बालपण* या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात माझ्या *मूल हसतं घर सजतं* या कवितेचा समावेश करून मला आपण उपकृत केले याबद्दल मी आपला मनःपुर्वक आभारी आहे.
सदर काव्यसंग्रह नुकताच हातात पडला. आणि एक वाचनीय काव्यसंग्रह वाचावयास मिळाल्याचा आनंद झाला. काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके व समर्पक झाले असून सर्वच कविता वाचनीय व आशयपूर्ण आहेत. त्यामुळे मी इथे कुणाचेही वयक्तिक नाव नमूद करत नाही.

सदर काव्यसंग्रह दुदुदुडू पावलं टाकता, टाकता अचानक सोडून गेलेलं तान्ह बाळ अथर्वच्या स्मृतीस समर्पित आहे.

या काव्यसंग्रहात एकूण उत्तोमोतम अशा ११५ कवितांचा समावेश असून लोकप्रिय ठरू पाहणारा, रसिक वाचकांकडे संग्रही असावा असा हा काव्यसंग्रह झाला असून खरं तर बऱ्याच काळानंतर असा आशयघन कवितासंग्रह हातात पडल्याने या संग्रहातील कविता वाचतांना मन रमून जाते व आपण वाचताच राहतो.
सर आपले पुनश्च आभार

आपला विश्वासू

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी, लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट... (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com 
somnathpagar@yahoo.co.in
Follow/ Subscribe me on my Blog, Youtube Channel,  Facebook, Whatsapp, Twitter, Linked in, Instagram, SoundCloud.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद.

मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

भावपूर्ण श्रद्धांजली

 *भावपूर्ण श्रद्धांजली*💐🙏🏻

पाचोरे वणी गावचे सुपुत्र लोकप्रिय, विद्यार्थीप्रिय शिक्षक, आपल्या जबरदस्त वक्तृत्व शैलीने जनमाणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्त्व, थोर समाजसेवक, ज्येष्ठ विचारवंत *कै. दौलतराव वाटपाडे गुरुजींचे* दुःखद निधन झाले आहे. वाटपाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

समाजाची कधीही न भरून निघणारी अशी हानी झाली आहे. अशा या दुःखाच्या प्रसंगी आम्ही सारे वाटपाडे कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. जेव्हा, जेव्हा त्यांना भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा योग आला तेव्हा, तेव्हा त्यांचेकडून कळत नकळतपणे फार काही शिकायला मिळाले आहे. खरं तर अशी शिकवणूक ही आयुष्याची शिदोरी असते. त्या शिदोरीच्या बळावर जीवनप्रवास सुरू असतो.

त्यांच्या अचानक जाण्याने आपण सारे पोरके झालो आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

त्यांच्या पवित्र स्मृतीस हे भावपुर्ण शब्द सुमने अर्पण. भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏🏻


वटवृक्षाची सावली

आज जशी हरवली

आप्पा तुमच्या जाण्यानं

लक्ष नेत्र पानावली ll१ll


तुम्ही आम्हास दाविला

मार्ग सचोटीचा खरा

जनामनात वाहील

कीर्ती सुगंधाचा झरा ll२ll


तुम्ही आमचे सर्वस्व

आम्हा आनंदाचे पर्व

थोर वक्तृत्व शैलीचा

खरा, खुरा होता गर्व ll३ll


तुम्ही दावल्या मार्गावं

पुढे, पुढे जात राहू

येता आठव तुमचे

चंद्र, सूर्य, तारे पाहू ll४ll


आशीर्वाद शिरावरी

उरी असेल जाणीव

तुम्ही सोबत नसाल

हिच असेल उणीव ll५ll


एक आदर्श शिक्षक

महामेरू कर्तृत्वाचे

पिढी घडवली तुम्ही

श्रद्धास्थान विद्यार्थ्यांचे ll६ll


लाभो शांती तव आत्म्या

ईश्वराशी हे मागणं

तुम्ही यावं परतुनी

पुनर्जन्म हो घेऊन ll७ll


तव स्मृतीस वंदन

शब्द सुमन अर्पण 

भावपूर्ण श्रद्धांजली

विनम्र अभिवादन ll८ll


सोमनाथ पगार, नाशिक

Mo.9273357159🙏🏻💐