google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: भाडेकरी व घरमालक यांच्यातील करारनामा कसा असावा याचा नमुना

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

भाडेकरी व घरमालक यांच्यातील करारनामा कसा असावा याचा नमुना

सदर भाडेकरी करारनामा हा रु. ५००/- च्या  Indian Non Judicial Stamp वर तथापी कायदेशीर सल्ला घेवून नियमाप्रमाणे योग्य रक्कमेच्या Stamp वर प्रिंट करण्यात यावा.

तसेच सदर माहिती हि केवळ माहितीस्तव असून प्रत्यक्ष करारनामा कायदेशीर सल्ला घेवून कायदेशीर मार्गाने करण्यात यावा. 

करारनामा

 करारनामा आज दिनांक माहे ऑक्टोबर सन २०२१ रोज शुक्रवार ते दिवशी नाशिक मुक्कामी...

श्री. मनाथ आवडाजी पगार

वय-४४ वर्षे, धंदा-नोकरी.

राहणार- १, वैष्णवी विहार, सिद्धेश्वर नगर रेशिंबंध लॉन्स मागे, हिरावाडी,

मो.क्र.९२७३३५७१५९.

लिहून घेणार

 

         -यांसी-

 

श्री. विष्णू बळीराम गायकवाड

वय- ५० वर्षे, धंदा- पेंटिंग काम.

राहणार- वार्ड नंबर- ८, मुक्काम पोस्ट- मालेगाव, नवीन मालेगाव,

मो.क्र.९८८१९४५९२१.

लिहून देणार

 कारणे करारनामा लिहून देतात तो ऐसा जे की :- 

०१) मिळकतीचे वर्णन:- तुकडी जिल्हा नाशिक, पोट तुकडी तालुका नाशिक, पैकी नाशिक शहरातील व नाशिक महानगरपालिका हद्दीतील गोपाळ नगर मधील अमृतधाम, पंचवटी परिसरातील मौजे नाशिक या गावचे शिवारातील मिळकतीचा सर्वे नं. २४८/३/२/१ ची पुरवणी या लेआउट प्लान मधील प्लॉट क्र. ६० यांसी क्षेत्र ३६.६१ चौरस मीटर या वरील रो-हाऊस क्र.एच-४, चे बांधीव क्षेत्र २१.०० चौरस मीटर व १५.६१ चौरस मीटर गार्डन स्पेस यांसी चतुसीमा रेकॉर्ड ऑफ राईट प्रमाणे. 

येणेप्रमाणे चतु:सिमेतील दरोबस्त प्लॉट्सह बांधीव रो-हाऊस मिळकत त्यात सर्व सुख सोयींसह वनरूम किचन, संडास, बाथरूम, मागेपुढे असलेल्या जागेसह तसेच इलेक्ट्रिक मिटर, पाण्याचे मीटर व पाईप लाईनसह रो-हाउस मिळकत.

 ०२) वर कलम ०१ यात वर्णन करण्यात आलेली मिळकत ही लिहून घेणार यांचे मालकीचे असून लिहून देणार यांना त्यांचे निवासा करिता जागेची गरज असल्याने त्यांनी सदरची मिळकतीची लिहून घेणार यांचेकडे मागणी केली. त्यानुसार उभयतांमध्ये आज रोजी करारनामा अस्तित्वात येत आहे सदर करारनाम्याच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत,

अटी व शर्ती

१) एक लिहून घेणार व देणार यांचे उभयतांमध्ये मुंबई भाडे नियंत्रण कायद्यानुसार घरमालक व भाडेकरू असा संबंध राहणार नसून उभयतांमध्ये लिहून घेणार व लिहून देणार असा संबंध राहील.

 २) सदरच्या मिळकतीची परवाना फी ही लिहून देणार यांनी दरमहा रक्कम रु.१०००/- (अक्षर रुपये एक हजार मात्र) देण्याचे ठरविण्यात आलेले आहे.

३) लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना सदरच्या मिळकतीचे वापराबाबत अनामत रक्कम रु. १००००/-  (अक्षरी रुपये दहा हजार मात्र) इतके द्यावयाचे ठरले असून आज रोजी सदर रक्कम रोख अदा केली आहे. सदरची रक्कम ही करारनाम्याची मुदत संपल्यावर एक रकमी लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना बिनव्याजी परत करावयाचे आहे.

 ४) सदरची फी लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना दरमहा दहा तारखेच्या आत रोख स्वरूपात अदा करावयाची आहे. सातत्याने तीन महिने परवाना फी लिहून देणार यांनी अदा न केल्यास सदरचा करारनामा आपोआप रद्द होईल. लिहून घेणार हे लिहून देणार यांनी जमा केलेली अनामत रक्कमेमधून सदरची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम लिहून लिहून देणार यांना अदा करून सदरच्या मिळकतीचा ताबा घेण्याचा हक्क लिहून घेणार यांना राहील.

 ५) सदरचा करारनामा हा दिनांक ऑक्टोबर २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२२ पावेतो म्हणजेच ११ महिने मुदतीकरिता अस्तित्वात राहील. त्यानंतरचा करारनामा आपोआप संपुष्टात येणार असून त्यासाठी वेगळा दस्त करण्याची गरज नाही.

 ६) लिहून देणार यांनी सदरचे रो हाऊस वापरताना लगत असलेल्या रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे इमारतीस धोका पोहोचेल अशा प्रकारचे कोणतेही स्फोटके किंवा तत्सम पदार्थ बाळगवयाचे नाही.

 ७) सदरचे रो-हाउस वापरतांना येणारे वीज बिल व पाणी बिल हे लिहून देणार यांनी दरमहा वेळोवेळी भरावयाचे असून इतर महानगरपालिकेचे सर्व ते कर टॅक्सेस लिहून घेणार यांनी भरावयाचे आहेत. 

८) सदरच्या करारनाम्याची मुदत ही अकरा महिन्यांची असून लिहून देणार यांना त्याअगोदर सदरचा करारनामा रद्द करावयाचा असल्यास अगर लिहून घेणार यांना सदरचा करारनामा मुदती अगोदर रद्द करावयाचा असल्यास उभयतांनी त्याकरिता एकमेकास एक महिना आगाऊ लेखी नोटीस अथवा तोंडी सूचना द्यावयाची आहे.

 ९) लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना जे रो-हाऊस करारनाम्याने दिलेले आहे, ते पूर्णपणे सुस्थितीत असून त्याच स्थितीत लिहून देणार यांनी सदरचा करारनामा संपतेवेळी लिहून घेणार यांना सदरच्या मिळकतीचा ताबा द्यावयाचा आहे.

 १०) लिहून देणार यांनी लिहून घेणार यांचे संमतीशिवाय सदरचे रो-हाऊस मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जो कायमस्वरूपी अस्तित्वात राहील असा करावयाचा नाही. अर्थात सदरच्या मिळकतीमध्ये कुठल्याही प्रकारचे बांधकाम, तोडफोड करावयाचे नाही. कोणत्याही प्रकारची तुटफुट अगर नुकसान झालेले आहे, असे लिहून घेणार यांचे निदर्शनास आल्यास लिहून घेणार यांचेकडे जमा असलेल्या अनामत रकमेतून सदरच्या तूटफुट अगर नुकसानीचा खर्च वसूल केला जाईल व शिल्लक अनामत रक्कम परत केली जाईल.

 ११) सदर मिळकतीत लिहून देणार हे राहत असताना मुंबई भाडे नियंत्रण कायदा व त्या अंतर्गत असणाऱ्या इतर पोट कलमान्वये लिहून देणार यांना भाडेकरू म्हणून कुठल्याही प्रकारचे हक्क सदर मिळकतीवर प्राप्त करता येत नाही. हे लिहून देणार यांना मान्य व कबूल आहे.

 १२) सदर मिळकतीच्या करारनाम्याची मुदत संपताच मी लिहून देणार सदर मिळकत विनातक्रार खाली करून देईल. यदाकदाचित ठरलेल्या मुदतीत मिळकत खाली करून दिली नाही तर तुम्ही माझे विरुद्ध योग्य ती कायदेशीर फौजदारी कारवाई करून त्याकामी येणाऱ्या खर्चास व परिणामास मी स्वतः जबाबदार राहील. असे या करारनाम्यावेळी  मान्य व कबूल करतो.

 १३) सदरचे रो हाऊस लिहून देणार यांना निवासी वापराकरिता दिलेले असून सदरच्या मिळकतीचा वापर हा त्यांनी फक्त निवासी उपयोगाकरिता करावयाचा आहे. त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा बेकायदेशीर वापर सदर मिळकतीचा करावयाचा नाही. यदाकदाचित अशा प्रकारची काही तक्रार आल्यास अथवा  बेकायदेशीर कृत्य केल्याचे आढळल्यास व त्याबाबत काही फौजदारी कारवाई झाल्यास त्याचे खर्चास व होणाऱ्या परिणामास लिहून देणार हे  स्वतः जबाबदार राहतील. हे लिहून देणार यांना मान्य व कबूल आहे

 १४) सदर मिळकतीत राहत असताना लिहून देणार यांना पासपोर्ट काढणे, कार/ मोटर सायकल घेणे, कार/ मोटरसायकल लायसन्स मिळवणे, बँकेत खाते उघडणे, टेलिफोन, मोबाईल घेणे/ ट्रान्सफर करणे, नवीन गॅस कनेक्शन घेणे/ ट्रान्सफर करणे व इतर खाजगी, सरकारी-निमसरकारी कामकाजासाठी वरील मिळकतीच्या पत्त्याचा पुरावा (ऍड्रेसप्रूफ) म्हणून वापर करण्यास लिहून घेणार यांची संमती आहे. परंतु मिळकतीच्या पत्त्याचा बेकायदेशीर वापर झाल्यास तो मालक व सदर मिळकतीवर बंधनकारक  राहणार नाही.

 सदरचा करारनामा हा आज रोजी उभयतांनी राजीखुशीने स्वसंतोषाने कोणत्याही धाक, दडपणास बळी न पडता साक्षीदारांसमक्ष लिहून ठेवला असे.

येणेप्रमाणे करारनामा.

 

ठिकाण

तारीख:-०८/१०/२०२१  

 

 

लिहून घेणार

यांचा फोटो 

 

 

                 श्री. सोमनाथ आवडाजी पगार

                 लिहून घेणार

 

  लिहून देणार

यांचा फोटो 

 

                श्री. विष्णू बळीराम गायकवाड

                लिहून देणार

साक्षीदार:-

१)

 

 

२)

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: