google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: गीत- बेधुंद झालो

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

गीत- बेधुंद झालो

मित्रानो!
हे गीत मी सोमवार दि.14 सप्टेम्बर 2015 रोजी पहाटे 4.45वा फक्त 10 मिनिटात लिहले आहे. कधी कधी एखादी रचना काही मिनिटात लिहली जाते तर कधी कधी काही दिवस, काही महीने तर कधी कधी वर्षानुवर्षे ती रचना मनात वा कागदावर अर्धवट रुपात असते. आणि मग वेळ आल्यावर पूर्ण होते किंवा होतही नाही.
जाग आली. मनात विचारांचा महापुर आला. कागद पेन घेउन रीता झालो तेव्हा कुठ हायस वाटल.
प्रसव वेदना व्हाव्या तश्या वेदना कविता कधी कधी देते. लिहून झाल्यावर मन मोकळ होत.
गीत- बेधुंद झालो
बेधुंद झालो मी, तूला नयनी पाहुनी
एकटाच उरलो, ह्रदय तुला वाहुनी !!ध्रु!!
जीवघेणी वेणी, अन कर्णफूल कानी
विश्वकर्मा जणु, तुला घडवले कोणी
निशब्द झालो, झाले तुझे गीत गाउनी !!1!!!
डोंगर ,दरया ,आभाळ, हि तली साचली
फुले ,पक्षी, वेलीही, मनसोक्त नाचली
सारे धन्य झाले ,रूप हे तुझे पाहुनी !!2!!
अशी हसली ,जशी बिजली कडाडली
तू अशी बोलली, जशी तोफ धडाड्ली
तुझी एकेक अदा ,गेली आग लाउनी!!3!!
रंग रूप नक्षिदार, रांगोळी काडली
अंग तंग हे ,झाडावर वेल वाडली
जगण्याचा अर्थ गेली समजाउनी !!4!!
सोमनाथ आ पगार, नाशिक
गीतकार/ कवि
मो 9273357159
ईमेल somnathapagar@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: