google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: लावणी; आला नवतीचा, ऋतू हा हिरवा

शनिवार, ३ जून, २०१७

लावणी; आला नवतीचा, ऋतू हा हिरवा

लावणी: आला नवतीचा, ऋतू हा हिरवा

आला नवतीचा, ऋतू हा हिरवा
राया इश्काचा, साज हो चढवा  llधृll
आला नवतीचा, ऋतू हा हिरवा

पाणी पाजा तुम्ही, या पाना फुलाला
बावरी नजर, हि शोधी कुणाला
नाही इथं कुणी, कदर कराया
आवरू कळना, कसं या मनाला
या तुम्ही एकदा, मायेनं मढवा ll1ll
आला नवतीचा, ऋतू हा हिरवा

इश्काचा हलवा, चाखाया बोलवा
मजवर नजरा, मला वाचवा
तुम्हा साठी झुलं, मनाचा पारवा
तुमचा इशारा, मनी हा गारवा
खेळ इश्काचा, इतिहास घडवा ll2ll
आला नवतीचा, ऋतू हिरवा

सोमनाथ पगार, नाशिक
गीतकार/कवी (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
सभासद: 
स्क्रिन रायटर्स असोशियशन
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
महाराष्ट्र साहित्य परिषद
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, रचना इतरत्रही पाठवलेल्या असतात, वाद उदभवू नये म्हणून व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: