https://youtube.com/user/ SomnathPagar हि लिंक ओपन करून youtube चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करण्यास नम्र विनंती

अभंग:- जन्माचे
हे सार
करावा
संसार l
थोडे
उपकार
जन्माचे हे सार l असते हो ll१ll
जन्माचे हे सार l असते हो ll१ll
अमर
हो व्हावे l
जगून
मरावे
मरून उरावे l कर्मानेची ll२ll
मरून उरावे l कर्मानेची ll२ll
सदा
झिजवावी l
नश्वर
हि काया
फुकाचीच माया l ध्यानी ठेवा ll३ll
फुकाचीच माया l ध्यानी ठेवा ll३ll
एकदाच
जन्म l
माणुसकी
धर्म
मागे राही कर्म l सत्य हेची ll४ll
मागे राही कर्म l सत्य हेची ll४ll
माय
बाप थोर l
जगी
या दैवत
ठेवूया मनात l जन सारे ll५ll
ठेवूया मनात l जन सारे ll५ll
पत्नी
मूलं सारे l
सह
प्रवाशी हे
सगे सोयरे हे l दागिने हो ll६ll
सगे सोयरे हे l दागिने हो ll६ll
लहान
नी थोर l
मनाचा
हा भ्रम
शेवटी मुक्काम l स्मशानी हा ll७ll
शेवटी मुक्काम l स्मशानी हा ll७ll
मुखी
गोड बोल l
जन्म
करा सार्थ
मित्र हेची पार्थ l सोमनाथा ll८ll
मित्र हेची पार्थ l सोमनाथा ll८ll
सोमनाथ
पगार,
नाशिक,
गितकार/कवी,
(MSRA,
MABMCM)
©®सर्व
हक्क सुरक्षित,
व्यावसायिक
वापरासाठी पूर्व परवानगी
आवश्यक
Follow
me on my Blog, Whatsapp, Facebook, Twitter, Linkedin, Instagram.
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा