google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: अभंग:- श्वासांची कहाणी

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

अभंग:- श्वासांची कहाणी

https://youtube.com/user/SomnathPagar हि लिंक ओपन करून  youtube चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करण्यास नम्र विनंती💐🙏

अभंग:- श्वासांची कहाणी

उगा न घालावा l हा जन्म हो वाया ll
जमवावी माया l ममतेची llll

पुण्य कर्म, धर्म, l जन्माची शिदोरी ll
फेडावी उधारी l भक्ती भावे llll

शेवट असे हा l जर ठाव जना ll
अहंभाव मना l कशापायी llll

धन दौलत हे l इथेच राहते ll
सोबत न येते l काडी माडी llll

समजून घ्यावा l जगाचा पसारा ll
मोह, माया न्यारा l घसारा हा llll

मिटताही डोळे l थांबतोच श्वास ll
शेवटी प्रवास l वैकुंठाशी llll

चार खांद्यावरी l शेवटची वारी ll
रड, गाग सारी l धनापोठी llll

सोमनाथ सांगे l श्वासांची कहाणी ll
खळाळते पाणी ll उद्यासाठी llll

सोमनाथ पगार, नाशिक, गितकार/कवी, (MSRA, MABMCM)
मो.9273357159. Blog:- https://somnathpagar.blogspot.com
E-mail: somnathapagar@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in
©®सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक
Follow me on my Blog, Whatsapp, Facebook, Twitter, Linkedin, Instagram.
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: