google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: गीत:- लबाड पोरगं, स्टाईल करतं

गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८

गीत:- लबाड पोरगं, स्टाईल करतं

लबाड पोरगं, स्टाईल करतं
पोरीला पाहून, स्माईल करतं llध्रुll
लबाड पोरगं.....

या केसांची हिप्पी, नाहीतर चप्पी
व्हाट्सअप, फेसबुकवर हॅपी
कधी हि स्पाईक, नवीन बाईक
ऑनलाइन न्यू, सरचिंग साईट
कमेंट देऊन, लाईक करतं ll१ll
लबाड पोरगं.....

 कॉलेजला दांडी, कॅंटीनला मांडी
मम्मी णि डॅड्डीला लावतय शेंडी
कडीमोडी जरी, दिसतेय बॉडी
सिग्नल हो तोडी, वर कुरघोडी
गॅंग बनवून, फाईट करतं ll२ll
लबाड पोरगं.......

समजतो हिरो, अभ्यासात झिरो
शायनिंग मारी, बनून हिरो
गर्ल फ्रेंड, बॉय फ्रेंड, हे नॉर्मल
रिलेशन शिप, झालीय फॉर्मल
चांगल्या डोळ्यांव, गॉगल लावतं ll३ll
लबाड पोरगं.......

 *सोमनाथ पगार* (सॅप), नाशिक
गीतकार/कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक (MSRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: