किती दुरूनच न्याहळावं या ऐवजाला
डाळिंब फुटले, तुझे गाल, तुझे ओठ,
किती दुरूनच न्याहळावं या ऐवजाला,
घोर लागला ग! माझ्या या वयाला. // ध्रु //
छातीवर तुझ्या, किती टनाचा ग! भार,
यौवनाला यावा, जसा आंब्याचा मोहर,
तू नटून सजून, करी साज शृंगार,
का वाटे तू , माझ्यासाठी नखरा केला. // 1 //
किती दुरूनच न्याहळावं........
तुझ्या डोळ्यात मी मुक्काम ठोकला,
माझ्या हृदयात, तुला आसरा दिला,
खाऊ दोघं भेळ, चल फिरायला,
तुझ्यासाठी नवा, फ्लॅट बुक केला. // 2 //
किती दुरूनच न्याहळावं........
का वाटे मला, तुला पाहावं, भेटावं,
वेगळी वाट, यावं तुझंच गाव,
टिप्पूर चांदणं, तुला कवेत घ्यावं,
खरं सांग असंच, वाटत का ग! तुला? // 3 //
किती दुरूनच न्याहळावं........
सोमनाथ आ.पगार
Tech. Asst. Electrical Engg.
K.K.Wagh Polytechnic,Second Shift,
Amrut Dham, Panchvati,
नाशिक -3
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा