google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: तुझ्या नयनी हे दिसले काजळ

मंगळवार, ३१ मे, २०१६

तुझ्या नयनी हे दिसले काजळ

[2/20, 8:10 PM] Deshpande Madan गोरेगांव: कविमित्र सोमनाथ पगार तुमची कविता मला माझ्या लहानपणात घेऊन गेली...मायकेल काकांचे बोंगो अाणून मी त्यावर क्रिश्यचन लोकांची गाणी म्हणत असे...एक दिवस त्यांचा बोंगो माझ्या हातून फुटला अाणि मी रडत रडत त्यांच्याकडे गेलो....ते हसून म्हणाले " अरे त्यात काय?" हा घे अजून एक! नवीन अाहे.. अाज ते नाहीत....हे सूर त्यांना अर्पण ज्यांनी माझे लोकसंगीत जोपासले....

मदन देशपांडे
गोरेगाव
मुंबई
२०-२-२०१६
रात्रौ: ८:१०
[2/20, 8:10 PM] Deshpande Madan 
गोरेगांव: गित:- तुझ्या नयनी हे दिसले काजळ

तुझ्या नयनी हे दिसले काजळ
मनी भावनांचे ऊठले वादळ ||ध्रु||

नागमोड़ी तुझी ग! चाल
माझ्या दिलाचे लई ग! हाल
तुझे पाहुन बाई ग! चाळ
नयनी आले माझ्या सादळ||1||

गोरी गोरी तुझी कांती 
मना पाहुन मिळे शांती
बघ दोघांच् खेळल बाळ
मत माझ मांडल प्रांजळ ||2||

तुला हौशिन भरिन चूड़ा
हाकू जोडिन संसार गाड़ा
मनी प्रेमच वाजे ग!  टाळ
निवड तुझ्या आवडीच् पातळ ||3||

सोमनाथ आ. पगार
गीतकार/ कवी
नाशिक
Mb 9273357159
Email: somnathapagar@gmail.com
Blog: www.somnathpagar.blogspot.com
[2/20, 8:31 PM] somnathapagar: मदन सर
आपले आभार शब्दात व्यक्त करु शकत नाही

फक्त हात जोड़तो
🙏🏻
[2/20, 8:33 PM] Deshpande Madan गोरेगांव: अरे छोडो यार...... जब दिल मिले तो नो अाभार..... पण कविता लई बेस..........😄

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: