सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

भक्ती गीत:संसारात किती, मानवा गुंतला

भक्ती गीत:संसारात किती, मानवा गुंतला
दि,.18 फेब्रुवारी 2017 वेळ रात्री 11वा.
संसारात किती, मानवा गुंतला
माय, बाप, देव, विसर पडला llधृll
जन्मा आला काय, सोबत घेऊन
नाव, गाव, धन, जाशील सोडून
दोन शब्द गोड, हात रे जोडून
राजा, रंक तोही, शेवटी रडला ll2ll
संसारात किती, मानवा गुंतला
पत्नी, मुलं बाळ, नसे रे कोणाचे
सुखातच साथ, मालक धनाचे
मुखी राम जप, चिज हे जन्माचे
जन्म दात्या दुःख, देऊन हरला ll2ll
संसारात किती, मानवा गुंतला
तुझं-माझं काही, नाही रे कामाचे
जगी असे थोर, नाते रे मनाचे
रंग, रूप सारे, असे रे क्षणाचे
जरा नाही भाण, कसा रे फसला ll3ll
संसारात किती, मानवा गुंतला
सोमनाथ पगार, नाशिक
गीतकार/कवी mb 9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog- https//somnathpagar.blogspot.com




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा