गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

अभंग:- दिंडी चालली पंढरी

https://youtube.com/user/SomnathPagar हि लिंक ओपन करून  youtube चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करण्यास नम्र विनंती💐🙏

अभंग:- दिंडी चालली पंढरी

दिंडी चालली पंढरी l
आनंदाचे धन उरी ||ध्रु||

सोडुनिया मोह, माया l
ओढ पंढरीची पायाllll

मुखी राम, कृष्ण हरी l
ऊन, वारा अंगावरी llll

भेटल्यावं बा विठ्ठल l
सांगं सारं मनातलं llll

धन्य धन्य वारकरी l
भक्ती भाव घरी दारी ||||

सुखाची हि वाट खरी l
जातसे पंढरपुरी ||||
शरीर असे ईश्वरी l
जाणतसे वारकरी ||||

सोमनाथ धन्य उरी
दिंडी चालली पंढरी ||||

सोमनाथ पगार, नाशिक, गितकार/कवी, (MSRA, MABMCM)
मो.9273357159. Blog:- https://somnathpagar.blogspot.com
E-mail: somnathapagar@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in
©®सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक
Follow me on my Blog, Whatsapp, Facebook, Twitter, Linkedin, Instagram.
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा